PhonePe, PayTM प्रमाणे Google Pay सुद्धा रिचार्जवर वसूल करणार Extra पैसे

टाइम्स मराठी । आजकाल डिजिटल बँकिंगचे जग सुरू आहे. त्यानुसार कोणत्याही गोष्टींसाठी आता ऑनलाइन पद्धतीने Google Pay, PhonePe, च्या माध्यमातून पेमेंट केले जाते. ऑनलाइन पेमेंट मुळे आज-काल कोणीही खिशात कॅश बाळगत नाही. भाजी घेण्यापासून ते पेट्रोल भरण्यापर्यंत सर्व ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने पेमेंट केले जाते. ऑनलाइन पेमेंट मुळे सर्व कामे सोपे झाले आहेत. एखाद्या व्यक्तीला पैसे  पाठवायचे असल्यास आता बँकेत जाऊन पैसे काढण्याची गरज भासत नाही. स्मार्टफोनच्या माध्यमातून एका क्लिकवर त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवले जातात. परंतु आता गुगल पे  हे ॲप्लिकेशन वापरणाऱ्या युजरसाठी वाईट बातमी आहे. आता Google Pay मोबाईल रिचार्ज करणाऱ्या युजर्स कडून एक्स्ट्रा पैसे घेणार आहे. जाणून घेऊया काय आहे प्रकरण.

   

गुगल पे, फोन पे या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बरेच जण मोबाईल रिचार्ज करत असतात. परंतु आता गुगल पेच्या माध्यमातून मोबाईल रिचार्ज करणाऱ्या युजर्सला आता एक्स्ट्रा पैसे भरावे लागणार आहे. याबाबत अजून कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आली नसून सोशल मीडियावर बऱ्याच युजर्सने एक्स्ट्रा पैसे घेत असल्याचा दावा केला आहे.

PhonePe, PayTM या ऑनलाइन पेमेंट ॲप च्या माध्यमातून सुरुवातीपासूनच मोबाईल रिचार्ज साठी एक्स्ट्रा पैसे वसूल केले जातात. फोन पे, पेटीएम यांनी एक्स्ट्रा पैसे वसूल करण्याची माहिती दिल्यानंतर गुगलने  गुगल पे वर युजर साठी  मोबाईल रिचार्ज हे फ्री मध्ये असेल असं सांगितलं होतं. परंतु सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉट मध्ये जिओ कंपनीचे 749 रुपयांचे रिचार्ज केल्यावर 752 रुपये कट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच गुगल पे ने ₹3 कन्व्हिनियस चार्ज कट केल्याचे सांगण्यात येत आहे.

PhonePe, PayTM वर  आकारली जाते एवढी फीस

मिळालेल्या माहितीनुसार, फोन पे आणि पेटीएम या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून  मोबाईल रिचार्ज केल्यास एक्स्ट्रा पैसे भरावे लागतात. त्यानुसार युजर्स ने 100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रुपयांचा रिचार्ज केल्यास, युजर्स ला एक्स्ट्रा पैसे भरावे लागत नाही. परंतु 200-300 रुपयांपर्यंत रिचार्ज करणाऱ्या युजर्स ला 2 रुपये एक्स्ट्रा शुल्क भरावे लागते. याशिवाय  300 रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज केल्यास 3 रुपये कन्व्हिनियस फीस यूजर्सला भरावी लागते.