टाइम्स मराठी । मित्रानो, सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. मोबाईलच्या माध्यमातून आपण सर्वच कामे अगदी घरबसल्या आणि आरामात करत आहोत. मग ते ऑनलाईन बँकिंग असो, एकमेकांना पैसे पाठवायचे असो, किंवा मोबाईल रिचार्ज अथवा लाईट बिल भरन असो… काही क्षणात ही कामे पटापट होत आहेत. GooglePay, PhonePe, Pay TM यांसारख्या अँपच्या माध्यमातून आपण ही कामे करत असतो. परंतु आता गुगल पे वापरणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक माहिती आहे. गुगल पे वरून तुम्ही मोबाईल रिचार्ज केल्यास तुमच्या बँक खात्यातून अतिरिक्त पैसे कट होत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चाप बसला आहे.
Google Pay वर रिचार्ज केल्यावर किती शुल्क पडतेय –
Google Pay च्या माध्यमातून तुम्ही जर100 ते 200 रुपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला 1 रुपये सुविधा शुल्क भरावे लागेल. 201 ते 300 रुपयांच्या रिचार्जवर सुमारे 2 रुपये अतिरिक्त शुल्क तसेच 301 रुपयांच्या वरच्या रिचार्जवर 3 रुपये सुविधा शुल्क आकारला जात आहे. यामुळे गुगल पे ला कोट्यवधी रुपयांचा बक्कळ नफा होणार आहे. ही गुगल पे ची अतिरिक्त कमाई असेल. त्यामुळे कंपनीला फायदाच होणार असला तरी ग्राहकांना मात्र याचा मोठा फटका बसत आहे.
यापूर्वी PhonePe वर अतिरिक्त शुल्क आकारले जात होते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहक मोबाईल रिचार्ज करण्यासाठी गुगल पे चा वापर करायचे. परंतु आता गुगल पे वर सुद्धा अशा प्रकारे पैसे कट होत असल्याने ग्राहकांना मात्र हा झटका मानला जात आहे. तसेच घरबसल्या मोबाईल रिचार्ज आता पहिल्यासारखं परवडणारे राहिले नाही अशी भावना ग्राहकांच्या मनात येत आहे.