Google Pay देतंय दिवाळीची ऑफर!! अशाप्रकारे मिळवा 501 रुपयांचे बक्षीस

टाइम्स मराठी । सध्या सर्व ठिकाणी दिवाळीची तयारी सुरू आहे. दिवाळीनिमित्त बऱ्याच कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट वर दिवाळी ऑफर देखील उपलब्ध करत आहेत. अशातच आता लोकप्रिय पेमेंट ॲप Google Pay ने देखील दिवाळीनिमित्ताने युजर्ससाठी एक स्पेशन गिफ्ट आणलं आहे. गुगल पे आता युजर्सला दिवाळीनिमित्त शगुन देत आहे. हे शगुन घेण्यासाठी तुम्हाला गुगल पे ॲप वर काही चॅलेंज पूर्ण करावे लागतील. हे चॅलेंज पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तुम्हाला गुगल पे रिवार्डच्या माध्यमातून 501 रुपयांचा शगुन मिळेल.

   

Google Pay या पेमेंट ॲपवर अमेरिकी कंपनी फेस्टिवल सिटी प्रमोशन करत आहे. त्यानुसार तुम्हाला 501 रुपयांचा शगुन सोबतच खास गिफ्ट देखील जिंकण्याचा चान्स देण्यात येत आहे. गुगल पे वर तुम्हाला काही चॅलेंजेस पूर्ण केल्यानंतर रिवॉर्ड देण्यात येईल. या रीवॉर्ड मध्ये तुम्हाला 501 रुपयांचा शगुन मिळेल. यामध्ये तुम्हाला एक दिवाळी मॅप मिळेल. यासाठी तुम्हाला दिलेल्या अटी पूर्ण करावे लागतील. Google Pay चे हे चॅलेंज सुरू करण्यापूर्वी तुम्हाला गुगल पे अपडेट करणे गरजेचे आहे. हे चॅलेंज अपडेटेड व्हर्जन वर उपलब्ध आहे. याशिवाय गुगल पे सोबत ऍक्टिव्ह बँक अकाउंट लिंक असणे देखील गरजेचे आहे.

अशा पद्धतीने पूर्ण करा चॅलेंज

1) तुमच्या मोबाईल मध्ये Google Pay अपडेट केल्यानंतर होम पेजवर जा.
2) त्यानंतर तुम्हाला promotions सेक्शन मध्ये Festival City ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.
3) त्यानंतर तुम्हाला दिवाळी मॅप दिसेल. या मॅप वर गेल्यावर तुम्हाला वेगवेगळे कलर एरिया दिसेल.
4) यामध्ये तुम्हाला स्वतःला गेम आणि चॅलेंजर्स पूर्ण करायचे आहेत.
5) एवढेच नाही तर 20 नोव्हेंबर पर्यंत ह्या मॅप मध्ये नवीन नवीन चॅलेंजेस अनलॉक करण्यात येतील.
6) जर तुम्ही जास्त एरिया आणि बिल्डिंग चॅलेंजेस अनलॉक केले तर तुम्हाला शगुन मिळेल.
7) या वेलकम शगुन साठी तुम्हाला एक रुपये पेमेंट करावे लागेल.
8) प्रत्येक चॅलेंज नंतर तुम्हाला शगुन मिळणार आहे.

Google Pay च्या शगुन सोबतच तुम्हाला गिफ्ट देखील मिळू शकतात. या गिफ्ट मध्ये तुम्हाला  Redmi Note 12 5G हा स्मार्टफोन जिंकण्याची देखील संधी मिळेल. त्यासाठी बिल्डिंग चॅलेंजेस उपलब्ध आहेत. या बिल्डिंग चॅलेंज मध्ये तुम्हाला वेगवेगळे ट्रांजेक्शन करावे लागतील. यासोबतच काही स्पेशल चॅलेंजेस देखील आहेत. यामध्ये तुम्हाला रांगोळी फेस्ट आणि फन झोन पूर्ण करावे लागेल. त्यानंतर गुगल पे तुम्हाला दोन स्क्रॅच कार्ड देईल. या कार्ड साठी तुम्हाला 501 रुपयांचा शगुन जमा करावा लागेल. या कार्डमध्ये कॅशबॅक स्पेशल लॉक्ड रिवॉर्ड उपलब्ध असेल.

स्पेशल लॉक्ड रिवार्ड मध्ये मिळतील ऑफर्स आणि हे गिफ्ट

Google Pay  च्या  स्पेशल लॉक्ड रिवार्ड मध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑफर्स आणि गिफ्ट मिळू शकतात. यामध्ये Redmi Note 12 5G, डोमिनोज, मिंत्रा, झोमॅटो, रिलायन्स मार्ट वर 30 टक्के सूट देखील मिळेल. या सोबतच Amazon प्राईम मेंबरशिप वर 120 रुपयांचे डिस्काउंट, युट्युब प्रीमियम मंथली सबस्क्रीप्शन वर 30% सूट, टाइम्स प्राईम एन्युअल सबस्क्रीप्शन वर 450 रुपये ऑफ, हॉटस्टार सबस्क्रीप्शन वर तीन महिन्यांसाठी 100 रुपये सूट आणि mx player एन्युअल सबस्क्रीप्शन वर 100 रुपयांचे डिस्काउंट यामध्ये मिळेल.