Google Pay वरील Transaction History कशी डिलीट करायची? फॉलो करा या स्टेप्स

टाइम्स मराठी । आज काल ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यास सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. सर्वत्र डिजिटलायझेशन झाल्यापासून प्रत्येक व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला PayTM, Google Pay, Phonepe यासारखे प्लॅटफॉर्म्स मिळतील. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट सुरक्षितरित्या केले जातात. बऱ्याचदा गुगल पे किंवा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेले ट्रांजेक्शन लपवण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी गुगल वर त्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. तुम्ही देखील तुमची Google Pay हिस्ट्री डिलीट करू इच्छित असाल किंवा ही History डिलीट होते की नाही याबद्दल तुम्हाला शंका असेल तर हे आर्टिकल नक्कीच वाचा.

   

Google Pay एप्लीकेशनच्या माध्यमातून पेमेंट केल्यानंतर आपल्याला एप्लीकेशनमध्ये ट्रांजेक्शन हिस्ट्री दिसते. ही History बऱ्याच व्यक्तींना डिलीट किंवा लपवायची असते. त्यासाठी youtube किंवा google वर हिस्ट्री डिलीट कशी करायची यासाठी ट्रिक्स शोधल्या जातात. बऱ्याचदा काही व्यक्तींना माहीत नसतं की, Google Pay वर करण्यात आलेल्या Transaction History डिलीट करता येते. तुम्ही देखील History डिलीट करू इच्छित आहात, तर खाली सांगितलेली सोपी पद्धत वापरा.

अशा पद्धतीने करा  ट्रांजेक्शन हिस्ट्री डिलीट

सर्वात आगोदर Google Pay ॲप ओपन करा.

त्यानंतर Google Pay मध्ये प्रोफाइल फीचर या आयकॉन वर क्लिक करा.

या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेटिंग ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर Privacy and Security या ऑप्शन मध्ये जा.

त्यानंतर Data and Personalization ऑप्शन वर क्लिक करा.

पर्सनलायझेशन ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गुगल अकाउंट लिंक दिसेल. या लिंक वर क्लिक करा.

लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन विंडोज स्क्रीन ओपन होईल.

नवीन विंडो ओपन झाल्यावर तुम्हाला Payment Transactions and Activities ऑप्शन मिळेल.

या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली डिलीट ऑप्शन दिसेल.

डिलीट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमची Transactions हिस्ट्री डेटा डिलीट होईल.

ट्रांजेक्शन हिस्ट्री डिलीट करण्यासाठी वरील प्रोसेस केल्यानंतर, डिलीट ऑप्शन वर क्लिक करा. तुम्हाला ट्रांजेक्शन ऍक्टिव्हिटीज डिलीट करण्यासाठी काही ऑप्शन दिले जातील. त्यानूसार तुम्हाला एक तासा पूर्वीची हिस्ट्री, पूर्ण दिवसाची हिस्ट्री अशाप्रकारे ऑप्शन दिले जातील. या ऑप्शन नुसार तुम्ही ट्रांजेक्शन हिस्ट्री डिलीट करू शकतात.