आता Google Pay वरील पेमेंट होणार काही सेंकदातच; PIN टाकण्याची गरजच नाही

टाइम्स मराठी । सध्या ऑनलाईन पेमेंट्सचा जमाना असून एकमेकांना पैसे पाठ्वण्यासाठी आपण गुगल पे, फोन पे यांसारख्या अँपचा वापर करतो. ऑनलाईन पेमेंट पद्धतीने अगदी काही मिनिटात आपण कोणाच्याही बँक खात्यात काही मिनिटातच पैसे टाकू शकतो त्यातच आता आणखी भर पडली असून आता गुगल पे (google pay) ने आपली पेमेंट करण्याची प्रकिया आणखीन सुलभ करण्यासाठी UPI Lite हे फीचर्स गुगल पे वर आणलं आहे. या नवीन फिचरमुळे UPI PIN न टाकताच आपल्याला सहज कोणतेही पेंमेट काही सेकंदात शक्य होणार आहे.

   

200 रुपये रुपये ट्रान्स्फर करण्याची परवानगी-

नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियामार्फत युपीआय लाईट पेमेंट सेवा गुगल पे (google pay) ने  वापरकर्त्यांसाठी आणली आली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून युपीआय लाईट फीचर लॉन्च करण्यात आले आहे. या नवीन फिचरमुळे वापरकर्ते पिन न टाकताच कोणतेही पेमेंट करु शकतात. हे फिचर फक्त 200 रुपये ट्रान्स्फर करण्याची परवानगी देते. त्यापेक्षा जास्त पेमेंट यावरुन करता येत नाही. युपीआय लाईट फिचर हे किरकोळ पेमेंट करण्यासाठी अती उपयुक्त आहे. या नवीन फिचरमुळे जलदरित्या पेमेंट करणे, तसेच विश्वासार्ह वाढवणे असा हेतू कंपनीचा आहे. हे फिचर वापरकर्त्यांच्या मुख्य अकाउंटशी जोडलेले असेल मात्र ते बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीवर अवलंबून राहणार नाही.

या नवीन फिचर मध्ये 2 हजार रुपयेपर्यंतची रक्कम वापरकर्ता जमा करु शकतो. यातील फक्त 200 रुपयांचे पेमेंट त्याला करता येऊ शकते. आतापर्यंत 15 बँकांनी या नवीन फिचरविषयी समर्थन दाखविले आहे. यापूर्वी हे फिचर पेटीएम आणि फोन पे आणले आहे. म्हणून आपल्या प्रतिस्पर्धांना आवाहन देण्यासाठी गुगल पे (google pay) ने  देखील हे फिचर आणले आहे.

दरम्यान युपीआय लाईट फिचरविषयी माहिती देताना, “हे फिचर आम्ही वापरकर्त्यांना सोयीस्कर, कॉम्पॅक्ट आणि सुपरफास्ट पेमेंट्सचा अनुभव देण्यासाठी तसेच काही किरकोळ पेमेंट सहज करण्यासाठी आणले आहे. या फिचरमध्ये NPCI आणि RBI सह भारत सरकार देखील भागीदार असल्याचा आम्हाला आनंद होत आहे.” अशी माहिती गुगल पे (google pay)  चे उपाध्यक्ष अंबारीष केंघे यांनी दिली आहे.