Google Pixel 2 ‘या’ तारखेला होणार लाँच; कंपनीकडून महत्त्वाचे अपडेट्स

टाइम्स मराठी । Google भारतामध्ये आपलं पहिलेच प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे. गुगलच्या Made By Google इव्हेंटमध्ये गुगलकडून पिक्सल 8, पिक्सल 8 pro आणि गुगल Google Pixel 2 यांचे एकत्रितपणे लॉन्चिंग करण्यात येणार आहे. लॉन्चिंग साठी घेण्यात येणारा गुगल इव्हेंट हा 4 ऑक्टोबरला असणार आहे. याबाबत कंपनीने खुलासा केला आहे. कंपनीने सांगितले की, हे प्रॉडक्ट ग्लोबल मार्केट सह भारतामध्ये लॉन्च होतील. आज आपण या सर्व प्रॉडक्ट बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

Google Pixel 2

Google Pixel 2 मध्ये 1.2 इंचचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 384 ते 384 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. यामध्ये स्नॅपड्रॅगन W5+ जेन 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टवॉच मध्ये wear OS 4 उपलब्ध आहे. तसेच या मध्ये तुम्हाला 306 mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 24 तासांपेक्षा जास्त पावर बॅकअप देते. हा पावर बॅकअप ऑलवेज ऑन डिस्प्ले अनेबल झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे.

किंमत –

Google Pixel 2 ची किंमत अजूनही कंपनीकडून उघड करण्यात आलेली नाही. परंतु या प्रॉडक्टच्या फर्स्ट जनरेशन च्या किमतीवरच या स्मार्टवॉच ची किंमत ठेवली जाऊ शकते. google पिक्सल या स्मार्टवॉच ची किंमत ब्लूटूथ आणि वायफाय बेस्ड मॉडेल साठी 349.99 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 29000 रुपये एवढी असू शकते. आणि LTE साठी ही किंमत 399.99 डॉलर म्हणजे ३३ हजार रुपयांपर्यंत असू शकते.

पिक्सल 8 आणि पिक्सल 8 प्रो स्पेसिफिकेशन

पिक्सल 8 आणि पिक्सल 8 प्रो या दोन्ही स्मार्टफोन मध्ये 6.17 इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 hz रिफ्रेश रेट सह येतोय . या दोन्ही स्मार्टफोनमध्ये टेन्सर G3 प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतात. मोबाईलच्या बॅटरी बाबत सांगायचं झाल्यास, पिक्सेल 8 या स्मार्टफोनमध्ये 4484 mAh बॅटरी देण्यात आली आहे. आणि पिक्सेल 8 pro मध्ये 4950 mAh बॅटरी उपलब्ध आहे.

पिक्सल 8 आणि पिक्सल 8 pro कॅमेरा

पिक्सल 8 मध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड सेंसर, टाइम ऑफ फ्लाईट सेन्सर देण्यात आले आहे. आणि पिक्सेल 8 प्रो मध्ये 64 एमपी प्रायमरी कॅमेरा, 64 मेगापिक्सल अल्ट्रावाईड कॅमेरा, 49 mp टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे.