Google Pixel 6a मिळतोय निम्म्या किंमतीत; कुठे आहे ऑफर?

टाइम्स मराठी । काही दिवसांमध्ये Flipkart चा बिग बिलियन डेज सेल सुरू होणार आहे. हा या वर्षीचा सर्वात मोठा सेल असून यामध्ये बऱ्याच वस्तूंवर बंपर डिस्काउंट देण्यात येणार आहे. त्यानुसार Google Pixel 6a या मोबाईल वर देखील मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना गुगलचा पिक्सल फोन कमी किमतीमध्ये खरेदी करता येईल. चला तर मग जाणून घेऊया ही ऑफर

   

मिळालेल्या माहितीनुसार, Google Pixel 6a हा मोबाईल भारतीय बाजारपेठेमध्ये 43 हजार 999 उपलब्ध आहे. परंतु Flipkart च्या या बिग बिलियन डेज सेलमध्ये तुम्ही हा फोन 26,999 खरेदी करू शकतात. किंवा यापेक्षाही कमी किमतीत तुम्ही हा स्मार्टफोन घरी आणू शकतात. या ऑफर बाबत फ्लिपकार्टच्या बॅनरवर सर्वात कमी किमतीमध्ये उपलब्ध असलेला पिक्सल कॅमेरा असे लिहिण्यात आले आहे.

काय आहेत मोबाईलची वैशिष्ट्ये – Google Pixel 6a

Google Pixel 6a या स्मार्टफोनमध्ये 6.10 इंच चा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सेल रिझोल्युशन आणि 60 hz रिफ्रेश रेट सह येत आहे. हा डिस्प्ले गोरिला ग्लास 3 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. या मोबाईल मध्ये कंपनीने गुगल टेनसॉर प्रोसेसर वापरला असून हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 OS सिस्टीमवर काम करतो.

मोबाईलच्या स्टोरेज बाबत सांगायचं झाल्यास, Google Pixel 6a हा स्मार्टफोन 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्यापैकी प्रायमरी कॅमेरा 12.2 मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा 12 मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेल एवढा देण्यात आला आहे. मोबाईलमध्ये 4410 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

अन्य फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, Google Pixel 6a या या फोनमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, एनएफसी, यूएसबी टाइप सी यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, कंपास मॅग्नेटोमीटर, प्रॉक्सिमिटी सेंसर, एक्सलेरोमीटर, एंबीयंट लाईट सेंसर, जायरोस्कोप, बॅरोमीटर यासारखे फीचर्स देखील देण्यात आले आहे.