Google Pixel 8 Pro नव्या स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच; पहा किंमत किती?

टाइम्स मराठी । भारतामध्ये 4 ऑक्टोबरला गुगल कंपनीने मेड बाय गुगल 2023 इव्हेंट घेतला होता. या इव्हेंट मध्ये कंपनीने Google Pixel 8 आणि Google Pixel 8 Pro हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले होते. त्यानंतर 12 ऑक्टोबरला हे स्मार्टफोन विक्रीसाठी खुले करण्यात आले होते. या इव्हेंट मध्ये कंपनीने Google Pixel 8 Pro हा स्मार्टफोन 12 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट मध्ये उपलब्ध केला होता. आता कंपनीने या स्मार्टफोनमध्ये आणखीन एक स्टोरेज वेरियंट लॉन्च केला आहे. यासोबतच कंपनीने बँक ऑफर देखील या नवीन स्टोरेज व्हेरियंटवर उपलब्ध केली आहे. हा नवीन व्हेरिएंट ऑब्सिडियन या एक कलर ऑप्शनसह उपलब्ध करण्यात आला आहे. जाणून घेऊया या व्हेरिएंटची किंमत.

   

ऑफर आणि किंमत

Google Pixel 8 Pro या स्मार्टफोनच्या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्टोरेज वेरियंटबाबत टीपस्टर ईशान अग्रवाल यांनी एक्स म्हणजेच ट्विटर वर पोस्ट करत माहिती दिली. Google Pixel 8 Pro हा स्मार्टफोन 12 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट मध्ये 4 ऑक्टोबरला लॉन्च करण्यात आला होता. यावेळी यांची किंमत 1,06,999 रुपये एवढी होती. आता कंपनीने 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केला आहे. या स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,13,999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. शिवाय कंपनीने या स्टोरेज व्हेरिएंटच्या खरेदीवर बँक ऑफर देखील उपलब्ध केल्या आहेत. त्यानुसार तुम्ही SBI बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून हा स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुम्हाला 9000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. याशिवाय 4000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील यामध्ये उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन– Google Pixel 8 Pro

Google Pixel 8 Pro या स्मार्टफोनमध्ये  6.7 इंच चा क्वाड HD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1,344 × 2992 पिक्सल रिझोल्युशन  आणि 120  hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. या मोबाईलमध्ये google चा Tensor G3 SoC आणि टायटन  M2 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14  वर काम करतो.

कॅमेरा

Google Pixel 8 Pro या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्यानुसार 50 MP प्रायमरी कॅमेरा, 48 MP सेकंडरी कॅमेरा, 10.5 MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 5050mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 30  W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.