Google Pixel Watch 2 नव्या फीचर्ससह भारतात लाँच; पहा किंमत

टाइम्स मराठी । Google ने भारतामध्ये पहिल्यांदा एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले आहे. गुगलच्या मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये  कंपनी कडून पिक्सल 8, पिक्सल 8 pro आणि गुगल पिक्सल वॉच 2 एक साथ लॉन्च करण्यात येणार असल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते . त्यानुसार  गुगलने आता  Pixel Watch 2 नव्या फीचर्ससह भारतात लाँच केलं आहे. आज आपण या Google Pixel Watch 2 या स्मार्टवॉचचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स जाणून घेऊयात.

   

गुगल पिक्सल वॉच 2 स्पेसिफिकेशन 

Google Pixel Watch 2 मध्ये 1.2 इंच चा गोल AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले  384 ते 384 पिक्सल रिझोल्युशन सह येत असून यामध्ये स्नॅपड्रॅगन  W5+ जेन 1 प्रोसेसर देण्यात आले आहे. यासोबतच या स्मार्टवॉच मध्ये wear OS 4 बूट उपलब्ध आहे. यासोबतच कंपनीने या वॉच मध्ये 306 mAh बॅटरी दिली आहे. बॅटरी चार्ज होण्यासाठी फक्त 75 मिनिटे लागतात. परतू एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर ही बॅटरी 24 तासांपेक्षा जास्त पावर बॅकअप देते. हा पावर बॅकअप ऑलवेज ऑन डिस्प्ले अनेबल झाल्यानंतर देखील आपल्याला मिळतो.

फीचर्स – Google Pixel Watch 2

Google Pixel Watch 2 मध्ये फिटबिट मल्टी पाथ हार्ट स्पीड सेंसर देण्यात आले आहे. या सेंसर मुळे  फिजिकल व्यायाम करत असताना हर्ट स्पीड  या घडाळ्यात आपल्याला दिसेल. यासोबतच बॉडी रिस्पॉन्स ट्रेकिंग वर स्ट्रेस मॅनेजमेंट सिस्टीम देखील यामध्ये देण्यात आली आहे. तसेच गुगल असिस्टंट देखील  उपलब्ध असून यामुळे हे घड्याळ वापरणे अत्यंत मजेशीर आहे. या वॉचमध्ये सिक्युरिटी वर आधारित फीचर देखील उपलब्ध आहे. या फीचर च्या माध्यमातून  रात्रीच्या वेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये जात असाल तर हे घड्याळ तुमची सुरक्षितता ठेवत. कंपनीने यामध्ये  AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजंट वापरले आहे. ज्यामुळे फिटनेस, स्लिप ट्रॅक,हार्ट बिट्स, गुगल असिस्टंट यासारखे बरेच फीचर मिळतात.

SOS फीचर

Google Pixel Watch 2 मध्ये  SOS सुविधा देखील देण्यात आली आहे. ज्यामुळे टाइमर शेड्युलच्या माध्यमातून तुम्ही कुठे आहात हे तुमच्या परिवाराला समजू शकेल. या सोबतच सिक्युरिटीच्या माध्यमातून तुम्हाला आपत्कालीन सर्विसेस सोबत संपर्क देखील करता येईल. त्याचबरोबर या वॉच मध्ये एक बॉडी रिस्पॉन्स सेंसर , फॉल डिटेक्शन, स्किन टेम्परेचर सेंसर देखील देण्यात आले आहे.

किंमत किती

Google Pixel Watch 2 ची किंमत 39,990 रुपये आहे. परंतु तुम्ही जर गुगलचा पिक्सल 8 हा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर तुम्हाला  गुगल पिक्सल वॉच फक्त 19,999 रुपयांमध्ये  मिळू शकते. Google Pixel Watch 2 आज पासून भारतामध्ये प्री ऑर्डर साठी उपलब्ध करण्यात आलं आहे. तुम्हाला हे स्मार्टवॉच सिल्वर,बे, मॅट ब्लॅक, ऑब्सीडियन, शाम्पेन गोल्ड, हेजल आणि पॉलिश सिल्वर,या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.