Google ने रिलीज केले Android 14; या Mobile ला मिळणार नवं अपडेट

टाइम्स मराठी । गुगलने Android 14 हे सॉफ्टवेअर नवीन फीचर्स रिलीज केले आहे. हे सॉफ्टवेअर फक्त काहीच स्मार्टफोन मध्ये उपलब्ध करण्यात आले असून यामध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. सध्या हे फीचर्स गुगल फोनसाठी रोल आउट करण्यात आले आहे. काही दिवसानंतर अँड्रॉइड फोन साठी देखील रोल आउट करण्यात येणार आहे. जाणून घेऊया Android 14 हे सॉफ्टवेअर कोणत्या स्मार्टफोन साठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

   

गुगलने Android 14 अपडेट करून यामध्ये बरेच छोटे छोटे बदल केले आहेत. यासोबतच गुगलच्या स्मार्टफोनसाठी सध्या हे उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये Pixel 4a 5G, Pixel 5 आणि 5a, Pixel 6 आणि 6 pro, Pixel 6a, Pixel 7 and 7pro, Pixel 7a, Pixel Fold, Pixel Tablet या स्मार्टफोनसाठी गुगलने Android 14 अपडेट करून रोल आउट केले आहे. लवकरच हे अपडेट अँड्रॉइड युजर साठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

Android 14 हे एक अँड्रॉइड चे नवीन अपडेट आहे. या अपडेट मुळे स्मार्टफोन वापरण्याचा एक्सपिरीयन्स वाढेल. या नवीन OS वर ब्लॅक अँड व्हाईट थीम सेट करण्याचे ऑप्शन देण्यात आले आहे. या नवीन अँड्रॉइड वर्जनमुळे स्मार्टफोनला पूर्णपणे नवीन लूक येईल. गुगलने यामध्ये वॉलपेपर देखील उपलब्ध केले आहेत. Android 14 नवीन अपडेट मुळे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये AI जनरेटेड वॉलपेपर ठेवू शकतात. Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम जेव्हा गुगल फोन मध्ये इन्स्टॉल होईल त्यानंतर दुसऱ्या कंपन्या अँड्रॉइड फोन मध्येही ऑपरेटिंग सिस्टीम रोल आउट करतील. या नवीन ऑपरेटिंग सिस्टीममुळे मोबाईल वापरणे आणखी मजेशीर होईल.