Google ची मोठी कारवाई!! Play Store वरून 43 मोबाईल अ‍ॅप्स हटवले; तुम्हीही करा Delete

टाइम्स मराठी । आज-काल मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरस जमा होतात आणि त्याचा थेट परिणाम आपल्या मोबाईल वर होतो. परंतु हे व्हायरस कशामुळे आणि कधी आले आहे हे आपल्याला देखील समजत नाही. बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग केल्यामुळे, तसेच प्ले स्टोर वरून काही ॲप डाऊनलोड केल्यामुळे हे व्हायरस आपल्या मोबाईल मध्ये येतात. काही ॲप्लिकेशन मध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरस असतात. असेच काही अँप्स गुगलने (Google) आपल्या प्ले स्टोअर (Play Store) मधून हटवले आहे. गुगल प्ले स्टोअर वर मालवेअर किंवा व्हायरस असलेले ॲप सापडले असून हे अँप्स आतापर्यंत 2.5 मिलियन वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.

   

गुगलने प्ले स्टोअर वरून 43 ॲप्स हटवले-

McAfee रिपोर्टच्या माध्यमातून या ॲपची माहिती मिळाली आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलं की, हे व्हायरस असलेले ॲप्स मोबाईलची स्क्रीन बंद असताना देखील जाहिरात दाखवत होते. मोबाईलची स्क्रीन बंद असताना जाहिरात दाखवल्यास मोबाईलची बॅटरी लवकर संपते आणि त्याचा युजर्स ला त्रास होतो. एवढेच नाही तर डेटा लिक कोणाचा देखील धोका यामुळे वाढतो. त्यामुळे गुगल ने प्ले स्टोअर वरून असे 43 मोबाईल ॲप्स हटवले आहेत. या ॲप्स मध्ये TV/DMB प्लेयर, म्यूजिक डाउनलोडर, न्यूज आणि कॅलेंडर या सरकारचा समावेश असून बरेच ॲप्स हे मीडिया स्ट्रीमिंग आहेत. यासोबतच या ॲप्स वर गुगल प्ले डेव्हलपर पॉलिसीचे उल्लंघन केल्याचा देखील आरोप आहे.

जर मोबाईल मध्ये व्हायरस घुसल्यास या ॲपच्या माध्यमातून कोणताही व्यक्ती युजरचा फोन नियंत्रित करू शकतो. हे ॲप लोकांचे मेसेजेस वाचण्यासाठी आणि स्टोरेज पाहण्यासाठी सक्षम आहे. एवढेच नाही तर बँकिंग फसवणूक देखील या ॲपच्या माध्यमातून होऊ शकते. जर तुमच्याही मोबाईलची स्क्रीन सतत चालू बंद होत असेल तर सर्वात अगोदर तुमच्या सेटिंग्स मध्ये जा. आणि बॅकग्राऊंड ॲप रिफ्रेश बंद करा. त्यामुळे कोणतेही ॲप बॅकग्राऊंड मध्ये चालू शकणार नाही. आणि मोबाईलची बॅटरी देखील चांगली राहील.