टाइम्स मराठी । जगातील सर्वात मोठी टेक कंपनी Google ने क्रोम बुक बनवण्यासाठी (Chromebooks) पीसी मेकर HP सोबत पार्टनरशिप केली आहे. याबाबत सोमवारी गुगलचे एक्झिक्युटिव ऑफिसर सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. त्यानुसार भारतात पहिल्यांदाच क्रोम बुक तयार करण्यात येणार आहे. गुगलच्या या निर्णयानंतर भारटाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
आम्ही भारतामध्ये Chrome Book च्या मॅन्युफॅक्चरिंग साठी HP या पीसी मेकर कंपनी सोबत पार्टनरशिप केली आहे. भारतात पहिल्यांदा क्रोम बुक प्रोडक्शन करण्यात येत असून भारतातील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या परवडेल अशा किमतीत सुरक्षित कम्प्युटिंगचा अभ्यास करणे सोपे होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि PLI धोरणामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनामध्ये महत्वपूर्ण पार्टनर म्हणून समोर येत आहे. असं सोशल मीडियावर ट्विट करत सुंदर पिचाई यांनी याबाबत माहिती दिली.
We’re partnering with HP to manufacture Chromebooks in India – These are the first Chromebooks to be made in India and will make it easier for Indian students to have access to affordable and secure computing. https://t.co/PuzZnck1wo
— Sundar Pichai (@sundarpichai) October 2, 2023
दरम्यान, यावेळी HP या PC मेकर कंपनीच्या प्रवक त्यांनी सांगितले की, क्रोमबुकचे प्रोडक्शन भारतामध्ये सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर नवीन क्रोम बुक ऑनलाईन उपलब्ध असून 15,990 रुपये किमतीमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही क्रोम बुक एक उपयुक्त असं डिवाइस आहे. या डिवाइसचा जगभरात पाच कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षकांना फायदा होईल.