आता Scammer Apps शोधण्यास होईल मदत; Google लॉन्च करणार  Cubes फीचर

टाइम्स मराठी | Google गल ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना चांगला अनुभव मिळवा यासाठी वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करत आहेत. आता गुगल कडून नवीन फीचर वर काम सुरू आहे. या फिचरचे नाव CUBES आहे. गुगलचे हे अपकमिंग फीचर एक डॅशबोर्ड प्रमाणे काम करेल. या फीचरच्या माध्यमातून युजर्स मोबाईल मध्ये किती कॅटेगिरी आणि किती ॲप्स उपलब्ध आहेत हे चेक करू शकतील. गुगलकडून हे अपकमिंग फीचर स्मार्टफोन आणि टॅबलेट युजर साठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

   

काय आहे हे फीचर

CUBES या फिचर वर बऱ्याच काळापासून काम सुरू आहे. काही महिन्यांपूर्वीच या फिचर बद्दल माहिती उघड झाली होती. CUBES या फीचरच्या मदतीने युजर्स ला स्कॅमर्स ॲप  ची माहिती मिळू शकेल. आज काल मोठ्या प्रमाणात  सायबर क्राईमचे गुन्हे वाढत आहेत. या फीचरच्या माध्यमातून हे गुन्हे रोखण्यासाठी मदत होऊ शकते. हे फीचर डॅशबोर्ड प्रमाणे काम करेल. ज्यामध्ये कॅटेगिरी लिस्टेड होईल. या कॅटेगिरी मधील उपलब्ध असलेल्या ॲप्स ला या फीचर च्या माध्यमातून चेक करता येईल.

स्कॅमर ॲप शोधण्यास होईल मदत

CUBES या फीचरच्या माध्यमातून मोबाईल मध्ये उपलब्ध असलेले सर्व ॲप्स युजर्स ला समजतील. यासोबतच स्मार्टफोनमध्ये एखादे डेंजर किंवा स्कॅमर ॲप असेल तर युजर्स ला एका मिनिटात माहिती मिळेल. त्यानुसार युजर्स असे ॲप लगेच Uninstall करू शकतात. हे गूगलचे सर्वात महत्त्वपूर्ण फीचर असेल. जानेवारी महिन्यामध्ये कंपनीकडून हे फीचर उपलब्ध करण्यात येऊ शकते. उद्या या फीचर वर काम चालू आहे.