टाइम्स मराठी । ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच गुगलने एक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता अँड्रॉइड युजर्स ला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. गुगल दरवेळेस जुने अँड्रॉइड वर्जन मधून सपोर्ट काढून घेत असत . त्याच प्रकारे आता google या वेळेस देखील अँड्रॉइड मोबाईल मधून प्ले स्टोरचा सपोर्ट काढून घेणार आहे. ऑगस्ट महिन्यात गुगल Android 4.4 KitKat वर play store चा सपोर्ट काढणार आहे.
गुगल प्ले सर्विस सपोर्ट हा अँड्रॉइड वर्जन सपोर्ट पेक्षा वेगळा असून गुगलने अँड्रॉइड वर्जन ला सपोर्ट करणे बंद केले तरीही गुगल प्ले सर्विस ला सपोर्ट करत राहील. परंतु प्ले स्टोअर सर्विस ला सपोर्ट बंद केल्या नंतर युजर्स ला बऱ्याच प्रॉब्लेम मला सामोरे जावे लागेल. गुगलने प्ले सर्विस ला सपोर्ट केल्यास फोन नवीन फंक्शन आणि नवीन सर्विसेस सह प्रॉपरली काम करू शकेल. Android 4.4 kitkat हे वर्जन 2013 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. आता या वर्जन ला 10 वर्ष पूर्ण झाले असून या वर्गांचे यूजर्स आता बऱ्यापैकी कमी झाले आहेत. या वर्जनवर आता फक्त एक टक्के अँड्रॉइड स्मार्टफोन्स आणि टॅबलेट काम करत आहेत म्हणूनच यावर गुगल प्ले सर्विस चा सपोर्ट रिलीज केलं जाणार नाही.
गुगल सपोर्ट थांबल्यावर Android 4.4 kitkat या वर्जनवर सुरू असलेल्या फोनवर युजर्सला गुगल प्ले स्टोअर वरून अपडेट्स मिळू शकणार नाही. त्यानंतर गुगल प्ले स्टोअर ऐवजी 4.4 kitkat या युजर्सला फक्त प्ले सर्विस 23.30.99 देण्यात येईल. जर तुम्हाला या गुगलच्या निर्णयापासून वाचायचे असेल, आणि तुमचा फोन 4.4 kitkat या वर्जन वर चालत असेल तर मोबाईल सेटिंग मध्ये जा. त्यानंतर तुम्ही फोन मध्ये ओएस चे अपडेट उपलब्ध आहे का हे चेक करू शकता. जर अपडेट उपलब्ध असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल अपडेट करून प्ले सर्व्हिसेसचा लाभ घेऊ शकतात.