Google लवकरच लॉन्च करणार नवीन फिचर; सर्च करताना होणार मदत

टाइम्स मराठी । कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण Google या सर्च इंजिनचा वापर करतो. या सर्च इंजिनचा वापर करून आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. किंवा मिळालेल्या उत्तरांवर आपले समाधान तरी होते. विद्यार्थ्यांपासून ते प्रोफेशनल व्यक्ती देखील गुगलचा वापर करत असतो. हे सर्च इंजिन म्हणजेच google वेगवेगळे फीचर्स  या वर्षापासून ॲड करत आहेत. जेणेकरून युजर्स ला या फीचर्स चा लाभ होईल. आता गुगल कडून आणखीन एक फीचर लॉन्च करण्यात येणार आहे.  या अपकमिंग फीचर च्या माध्यमातून google वर काहीही सर्च करण्याचा अनुभव अतिशय चांगल्या पद्धतीने मिळेल.

   

काय आहे फिचर

काही दिवसांपूर्वी Google ने भारत आणि अमेरिका येथील युजर्स लवकरच सर्च रिझल्ट वर कमेंट करू शकतील अशी घोषणा केली होती.  या घोषणेनंतर आता गुगलकडून नवीन फीचर्स वर काम सुरू आहे. गुगल सर्च मध्ये लॉन्च करण्यात येणाऱ्या नवीन फीचर चे नाव सर्च नोट्स आहे. सध्या या फीचर ची टेस्टिंग सुरू असून लवकरच युजर्स साठी हे फीचर उपलब्ध करण्यात येईल. हे फीचर लॉन्च झाल्यानंतर सर्च रिझल्ट किती फायदेशीर आहे हे युजर्सला समजेल. हे सर्च नोट्स फीचर ऑप्ट इन फीचरच्या रूपामध्ये काम करेल. यासोबतच फीचर च्या माध्यमातून सर्व दृष्टिकोनातून माहिती मिळवणे देखील सहज सोपे होईल. या सर्च नोट्सच्या माध्यमातून यूजर्सला एखाद्या खास विषयावर मत मांडण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल.

अशा पद्धतीने वापरता येईल हे फीचर

टेक दिग्गज ने दिलेल्या माहितीनुसार, या फिचरच्या माध्यमातून वेब पेज बद्दल फायदेशीर रेफरन्स प्राप्त करता येईल. जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल. आणि तुम्ही तुमचे विशेष मत संपूर्ण जगासोबत मांडू शकतात. सर्च मध्ये नोट्स वापरण्यासाठी युजर्सला सर्वात पहिले गुगल ॲप या डिस्कवर जावे लागेल. त्यानंतर सर्च रिझल्ट च्या खाली नोट्स बटन दिसेल. या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर  तुम्हाला नोट्स पाहणे आणि बनवण्यासाठी मदत होईल.