Deepfake बाबत Google करणार कारवाई; युट्युबर्सला AI वापराबाबत द्यावी लागेल माहिती

टाइम्स मराठी । सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम वाढताना दिसून येत  आहे. यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निर्देश लागू करण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून Deepfake हा प्रकार मोठ्या प्रमाणात उघड होत आहे. या Deepfake चा सामना बऱ्याच एक्ट्रेसला देखील करावा लागला.  यामुळे आता भारत सरकारने ठोस नियम तयार केले असून यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार आता गुगलने देखील youtube प्लॅटफॉर्मच्या नियमांमध्ये बदल केले असून आता युट्युब कन्टेन्ट क्रियेटर्स ला कोणतीही पोस्ट करण्यापूर्वी AI वापराबाबत खुलासा करावा लागणार आहे.

   

अशा पद्धतीने केली जाईल कारवाई

यूट्यूब च्या माध्यमातून बरेच युजर्स आता स्वतःचा कंटेंट क्रिएट करून  व्हिडिओज तयार करत आहेत. या कंटेंट व्हिडिओज च्या माध्यमातून youtube हे प्लॅटफॉर्म यूजर साठी पैसे कमवण्याचे साधन बनले आहे. परंतु आता याच youtube प्लॅटफॉर्मवर क्रियेटर्स कडून डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात येत आहे. त्यामुळे आता कंटेंट क्रियेटर्सला  व्हिडिओमध्ये AI चा कसा आणि किती वापर करण्यात आला आहे? काय बदल करण्यात आले आहे याबाबत संपूर्ण माहिती द्यावी लागेल. जर क्रिएटर्सने ही माहिती न दिल्यास google स्वतः क्रियेटर्स वर कारवाई करत पोस्ट करण्यात आलेले व्हिडिओज हटवणार आहे. ही प्रक्रिया काही महिन्यांमध्ये सुरू करण्यात येईल.

काय आहे डीपफेक प्रकरण

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे बरेच फ्रॉड केसेस देखील उघड झाले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजंट च्या माध्यमातूनच डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात येत आहे. डीपफेक व्हिडिओ म्हणजे असा व्हिडिओ ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा चेहरा आवाज आणि हावभाव बदलून तयार करण्यात आलेला नवीन व्हिडिओ. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना, कैटरीना कैफ, काजल  यासोबतच सारा तेंडुलकर देखील डीपफेकचा शिकार बनली होती. डिपफेक व्हिडिओमुळे या एक्ट्रेस ला बराच त्रास सहन करावा लागला होता.

केंद्र सरकारही करत आहे कारवाई

केंद्र सरकार आता डीपफेक च्या बाबतीत मोठे गंभीर पाऊल उचलत आहे. आता डीपफेक आणि ऑनलाइन चुकीच्या कंटेंट बाबत तक्रार करण्यासाठी सरकारकडून नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्मवर युजर्स चुकीचा कंटेंट किंवा  डीपफेक सारख्या व्हिडिओची तक्रार करू शकतात. तक्रार केल्यानंतर  कन्टेन्ट क्रियेटर्स आणि शेअर करणाऱ्या व्यक्तींवर FIR दाखल करण्यात येणार आहे.