खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना सरकारचा दणका; 8 Youtube चॅनेल्स केली बंद

टाइम्स मराठी । आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी Youtube वर मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन व्हिडिओज बघायला मिळतात. युट्युबवर हे व्हिडिओज पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. बरेच Youtube चॅनेलवर समाजात द्वेष पसरवणाऱ्या बातम्या आणि माहिती पसरवल्या जातात. त्याचबरोबर खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल देखील केली जाते. अशा यूट्यूब चैनलवर केंद्र सरकारने आता मोठी कारवाई केली आहे. लोकसभेच्या निवडणुका वेळेपूर्वी घेण्यात आल्याचे वृत्त आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंदी यासारख्या खोट्या बातम्या काही यूट्यूब चैनल वरून पसरवण्यात आल्या होत्या. ज्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून या खोट्या बातम्या पसरवण्यात आलेल्या आहेत त्या चैनल वर सरकारने कडक कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या या चॅनलवर लाखो करोडो सबस्क्राईबर आहे.

   

केंद्र सरकारने कारवाई केलेल्या बऱ्याच यूट्यूब चैनल वर देशाच्या लष्करा बद्दल चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्या यूट्यूब चैनल वर बरीच चुकीची माहिती आढळून आली. प्रेस इन्फॉर्मेशनने या चॅनेल वरील माहिती आणि बातम्यांची सत्यता तपासली तेव्हा बऱ्याच त्रुटी आढळून आल्या. यामुळे खोट्या बातम्या पसरवणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या चैनल बाबत सरकारने कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल एका अधिकाऱ्याने सांगितले की काही दिवसांपासून सरकारकडून सोशल मीडियावर बारकाईने लक्ष्य ठेवले जात आहे. याबाबत पूर्वीपासूनच सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. समाजाची दिशाभूल करणारे आणि भडकावणाऱ्या बातम्यावर कठोर कारवाई केली जात आहे. यापूर्वी देखील सरकारने खोट्या बातम्या पसरवनाऱ्या बऱ्याच युट्युब चॅनेलवर कारवाई केली होती.

सरकारकडून नुकतीच कारवाई करण्यात आलेले चॅनेल खालीलप्रमाणे-

1) यहा सच देखो
2) कॅपिटल टीव्ही
3) के पी एस न्यूज
4) सरकारी ब्लॉग
5) अर्ण टेक इंडिया
6) एस पी एन 9 न्यूज
7) एज्युकेशनल दोस्त
8) वर्ल्ड बेस्ट न्यूज