मोदी सरकारचा मोठा निर्णय!! लवकरच आणणार स्वदेशी वेब ब्राउजर; Chrome ला देणार टक्कर

टाइम्स मराठी । भारत हा देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याच्या मार्गावर असताना भारत सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे. आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat) या योजनेच्या माध्यमातून स्वदेशी वेब ब्राउजरला (Web Browser) समर्थन देण्यासाठी भारत सरकारने एक कार्यक्रम सुरू केला आहे. भारत सरकार नवीन वेब ब्राउझर लॉन्च करणार आहे. हे वेब ब्राउझर डेव्हलप करण्यासाठी एकूण तीन कोटींपेक्षा जास्त आर्थिक अनुदान देण्यात आलेले असून यावर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय विभागाद्वारे निरीक्षण केले जाणार आहे. हा वेब ब्रॉवझर Google Chrome, Firebox, Mozila, Opera Mini यांना टक्कर देईल.

   

काही दिवसांपासून केंद्र सरकारने विदेशी लॅपटॉप आणि कम्प्युटरच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर आता परदेशी वेब ब्राउझर्सवर अवलंबून न राहता 2024 च्या अखेरीस स्वदेशी वेब ब्राउजर डेव्हलप करून त्याचे लॉन्चिंग करण्याचा सरकारचा उद्देश आहे. यासाठी त्यांनी देशांतर्गत स्टार्टअप शैक्षणिक संस्था कॉर्पोरेशनला कार्यक्रम यामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. याबाबत अधिसूचना जारी करत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितलं की, मोदी सरकारच्या निर्णयामागचं खास कारण म्हणजे आत्मनिर्भर भारत हे आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही परदेशी वेब ब्राउझरवर अवलंबून राहू शकत नाही. अर्थव्यवस्थासोबतच आपल्याला डिजिटल क्षेत्रावर नियंत्रण ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर नागरिकांचे पूर्ण संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

सध्या भारताचा इंटरनेट मार्केटमध्ये 850 दशलक्ष युजर्स आहेत. त्याचप्रमाणे जुलै महिन्यातल्या similerweb च्या डेटानुसार 88.47 टक्के मार्केट शेअर्स सह गुगल क्रोम हे वेब ब्राउझर आघाडीवर असून सफारी 5.22 टक्के, मायक्रोसॉफ्ट एज दोन टक्के, सॅमसंग इंटरनेट 1.5 टक्के mozilla firefox 1.28 टक्के आणि इतर 1.53% एवढे आहेत.