टाइम्स मराठी | इलेक्ट्रिक कार किंवा इलेक्ट्रिकटू व्हीलर या वाहनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. कोरोना महामारीच्या काळानंतर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढ झाली. आणि ती वाढ अजूनही सुरू आहे. या इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आता सरकारने एक खास काम करण्याचं ठरवलं आहे. आता सरकार दोन महिन्याच्या आत इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग आणि बॅटरी सेटिंग स्टेशन साठी एक ॲप लॉन्च करणार आहे. या ॲप मधून आपल्याला चार्जिंग स्टेशन कोठे आहे? बंद आहे की चालू? याची माहिती मिळू शकते.
सरकार लॉन्च करत असलेल्या या ॲपचा विकास करण्यासाठी निती आयोगाकडे जबाबदारी टाकण्यात आली आहे. या ॲपच्या माध्यमातून बॅटरी स्टेशनचे लोकेशन आणि क्षमता याबद्दल माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहना संबंधित उपकरणे, चार्जिंग पॉइंट हे सर्व ह्या ॲपच्या माध्यमातून दाखवण्यात येईल.
आता सध्या एका अँप वर इंटरऑपरेबिलिटी च्या कमतरतेमुळे तुमच्याकडे असलेले इलेक्ट्रिक वाहन ज्या कंपनीचे आहे. त्याच कंपनीच्या चार्जिंग पॉइंटचे लोकेशन तुम्हाला मिळते. पण नवीन ॲप लॉन्च झाल्यावर एमजी, मर्सिडीज, एईएसएल या सर्व गाड्यांची स्टेशन पॉईंट त्याचबरोबर बॅटरी स्वॅपिंग स्टेशन तुम्हाला दिसू शकतील. या अँप मध्ये नंतर बुकिंग आणि पेमेंट हे ऑप्शन देखील उपलब्ध करून देण्यात येईल. चार्जिंग स्टेशन कोठे आहे, ते सुरु आहे की नाही, त्यांची क्षमता, कनेक्टर, या सर्वांची माहिती या ॲपद्वारे मिळू शकेल. वाहन कनेक्टरच काम हे चार्जिंग स्टेशन पासून ते इलेक्ट्रिक कारच्या ऑन बोर्ड चार्जर पर्यंत चार्जिंग सप्लाय करते. त्यानंतर ऑन बोर्ड चार्जर एसी करंट ला डीसी करंट मध्ये परावर्तित करतो. आणि इलेक्ट्रिक कार चार्जिंग होते.
सध्या देशांमध्ये सात हजार चार्जिंग स्टेशन आहेत. परंतु भारतामध्ये प्रत्येक 75 इलेक्ट्रिक कार साठी एक चार्जिंग स्टेशन आवश्यक आहे. आता ऑइल मार्केटिंग कंपन्यांना 22 हजार चार्जिंग स्टेशन बनवण्याची मागणी फास्टर ऍडोप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रिक वेहिकल्स FAME या कंपनीने केली आहे. त्यासाठी या कंपनीने 800 करोड रुपयांची तरतूद केली आहे.
पेट्रोल पंपावरच नाही तर बऱ्याच हॉटेल्सने देखील त्यांच्या हॉटेलच्या परिसरात चार्जिंग स्टेशन स्थापित केले आहे. त्याचबरोबर इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड ने मागच्या वर्षी त्यांच्या मालकीच्या जागेवर 92 ठिकाणी चार्जिंग स्टेशन बनवले होते. इलेक्ट्रिकल वाहन खरेदी करत असताना बऱ्याचदा चार्जिंग स्टेशन आपल्या घराजवळ असेल की नाही, ते सुरू आहे की नाही याचा प्रश्न पडतो. परंतु सरकार लॉन्च करत असलेल्या ॲपमुळे आपल्याला याबद्दलची सर्व माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर यामुळे चार्जिंग पॉइंट शोधण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत सुध्दा वाचेल.