Shocking Video : आधी तरूणीच्या समोरच तिच्या होणाऱ्या नवऱ्याला गोळ्या घातल्या अन् नंतर स्वतःलाही संपवलं

टाइम्स मराठी । सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भर दिवसा युवती समोरच तिच्या होणाऱ्या नवऱ्याला शूट केल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर गोळी मारल्यानंतर या शूटरने स्वतःला देखील गोळी मारून आत्महत्या केली आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही रस्त्यात मृत अवस्थेत पडलेले दिसत असून ही तरुणी मोठ्या मोठ्याने ओरडताना दिसत आहे. ही घटना रविवारी पोलैंड येथील पोन्जान या ठिकाणी घडली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हे पूर्ण दृश्य कैद झाले आहे.

   

या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका मेन रोडच्या साईडने दोन युवक आणि एक युवती उभी आहे. एका युवकांच्या हातात बंदूक आहे. त्याने त्या युवतीच्या समोरच तिच्या होणाऱ्या नवऱ्याला गोळी मारून त्याची निर्घृण हत्या केली. यानंतर ती युवती मोठ्या मोठ्याने ओरडत होती, काही वेळानंतर त्या युवतीचा होणारा नवरा मृत अवस्थेत रस्त्यावर पडलेला असताना पुन्हा त्याने निशाणा लावून गोळी झाडली. आणि एक दोन सेकंदा नंतर लगेच त्याने त्याच्या डोक्यावरची कॅप काढून स्वतःच्या डोक्यावर बंदूक लावून स्वतःलाही गोळी मारून आत्महत्या केली.

हा 53 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये ती युवती मोठ्यामोठ्याने ओरडताना दिसत आहे परंतु तिची कोणीही मदत करत नसून या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ ट्विटर वर पोस्ट करण्यात आलेला असून आतापर्यंत हा व्हिडिओ 25.9 k लोकांनी बघितला असून 60 लोकांनी रिट्विट केला आहे. सदर आरोपीने असं का केल? याबाबत माहिती समोर आलेली नाही, परंतु सोशल मीडियावरील हत्येचा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल हे मात्र नक्की.