भारतात लाँच झाली नवीन ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन; खरेदीवर मिळत आहे 50% डिस्काउंट 

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या कंपन्या वॉशिंग मशीन लॉन्च करत असतात. आता Haier कंपनीने नवीन वॉशिंग मशीन भारतीय बाजारपेठेत  लॉन्च केली आहे. लॉन्च करण्यात आलेली ही वॉशिंग मशीन फुल ऑटोमॅटिक मशीन आहे. हे मॉडेल Haier च्या कॉम्बी सिरीजचा एक पार्ट आहे. या लेटेस्ट वॉशिंग मशीन ला विजेची बचत करण्यासाठी 5 स्टार रेटिंग देण्यात आली आहे. यामध्ये कंपनीने नवीन मोटर टेक्नॉलॉजीचा वापर केला असून कमी आवाज आणि कमी कंपनामध्ये ही वॉशिंग मशीन चालते. आज आपण या वॉशिंग मशीनचे फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत जाणून घेऊयात.

   

डिझाईन

Haier कंपनीने लॉन्च केलेली ही नवीन वॉशिंग मशीन पूर्णपणे ऑटोमॅटिक मॉडेल आहे. हे मॉडेल मेटल बिल्ट सह येते. यामध्ये कंपनीने फ्रंट लोड डिझाईन उपलब्ध केलं असून मशीन मध्ये एक टेम्पर्ड ग्लास डोर मिळतो. या वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुण्यासाठी 10.5 किलोग्रॅम क्षमता आणि कपडे सुकवण्यासाठी 7 किलोग्रॅम क्षमता आहे.

डबल स्प्रे टेक्नॉलॉजी

या वॉशिंग मशीनच्या ड्रमचा आकार 525 mm एवढा आहे. या मशीनच्या आत मध्ये कपडे साफ करण्यासाठी डबल स्प्रे टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये बारा वॉशिंग मशीन मोड देण्यात आले असून हे मोड बटनच्या माध्यमातून वापरता येऊ शकतात. एवढेच नाही हे वॉशिंग मशीन HAISMART नावाच्या अँप ने सुद्धा कंट्रोल करता येऊ शकते. या मशीनमध्ये WIFI कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे. जेणेकरून युजर्सला लांब अंतरावरून सुद्धा वॉशिंग मशीन कंट्रोल करण्यासाठी आणि शेड्युल करण्यासाठी मदत होईल.

मोशन मोटर

या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या कॉम्बि वॉशिंग मशीन मध्ये पहिली डायरेक्ट मोशन मोटर वापरण्यात आली आहे. ही मोटर  कमी व्हायब्रेट होते.  आणि 53  DB पर्यंत आवाज कमी करते. या मोटरचा वेग 1400 RPM एवढा असून वीज बचत देखील या वॉशिंग मशीनच्या माध्यमातून होते. या मोटर वर कंपनीने 20 वर्षांची वॉरंटी दिली आहे. आणि वॉशिंग मशीनच्या पार्टसवर 5 वर्षांची वॉरंटी मिळते.

किंमत किती?

हायर वॉशर आणि ड्रायर कॉम्बी सिरीज वॉशिंग मशीनची किंमत  84,990  रुपये ठेवण्यात आली आहे. हे एक सिंगल कलर व्हेरिएंट असून  यामध्ये डार्क झेड सिल्वर  उपलब्ध आहे. कंपनीने या वॉशिंग मशीनच्या खरेदीवर इंट्रोडक्शनरी ऑफरच्या माध्यमातून 50% डिस्काउंट दिला आहे. त्यानुसार ग्राहक ही वॉशिंग मशीन 42,990 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकतात. ही वॉशिंग मशीन तुम्ही क्रोमाच्या वेबसाईट वरून देखील खरेदी करू शकता. हायर कंपनीकडून ही वॉशिंग मशीन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लवकरात लवकर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येईल.