Hands Free Scooter : बाजारात आली Handle नसलेली स्कुटर; अपंग व्यक्तींसाठी ठरणार वरदान

Hands Free Scooter । सध्याचे जग हे टेक्नॉलॉजीचे जग आहे. दररोज काहीतरी नवीन तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनवीन गोष्टी, नवनवे अविष्कार घडताना आपण पाहतोय. आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जपानी ऑटोमोबाईल कंपनी होंडाने हॅन्डल नसलेली स्कुटर बाजारात आणली आहे. जगातील अपंग व्यक्तींसाठी ही स्कुटर नक्कीच वरदान ठरणार आहे, कारणही स्कुटर ऑपरेट करण्यासाठी हाताचा वापर करण्याची गरज नाही.युनि वन असे या स्कूटरचे नाव असून या स्कुटर मध्ये नेमक्या कोणत्या खास गोष्टी आहेत ते आज आपण जाणून घेऊयात….

   

Handle नसलेली स्कुटर (Hands Free Scooter) तयार करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे, अपंग व्यक्तींना खऱ्या अर्थाने आधार देणं.. हि स्कुटर चालवत असताना अपंग व्यक्तींना इतरांच्या मदतीची गरज भासणार नाही . ते त्यांच्या हावभावाने ही स्कुटर कंट्रोल करू शकतात. हँड्स-फ्री स्कूटर सहज आणि सोप्प्या पद्धतीने राइडिंग अनुभव देण्यासाठी अपडेटेड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे. यामध्ये अपडेटेड सेन्सर्स आणि इंटेलिजंट सिस्टीमचा अनुभव मिळतो. रायडर्सच्या फक्त हालचाली ओळखून त्यानुसार प्रतिसाद देण्यास ही स्कुटर सक्षम आहे. रायडर्स मॅन्युअल इनपुटच्या गरजेशिवाय स्कूटरचा वेग, दिशा आणि ब्रेकिंग नियंत्रित करू शकतात.

प्रतितास 6 किलोमीटर धावणार – Hands Free Scooter

या स्कूटरमध्ये एकच सीट असेल. खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसून ही अनोखी स्कूटर चालवता येते. बॅटरीवर चालणारी ही स्कूटर प्रतितास 6 किलोमीटर वेगाने धावू शकते. ही स्कूटर सुमारे 110 किलो वजन उचलण्यास सक्षम असेल. होंडाने या स्कुटर मध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये सुद्धा दिली आहेत. ऑटोमॅटिक ब्रेकिंग, स्थिरता नियंत्रण यंत्रणा, टक्कर होण्याआधीच मिळणार अलर्ट यांसारखे सिक्युरिटी फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.