5000 रुपयांत बुक करा Harley Davidson X440; 3 ऑगस्ट पर्यंत मुदत

टाइम्स मराठी । अमेरिकन बाईक निर्माता हार्ले डेविडसन आणि हिरो मोटोकार्प या कंपनीसोबत पार्टनरशिप केल्यानंतर भारतीय बाजारपेठेमध्ये पहिले मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. Harley Davidson X440 हे सर्वांत किफायती मॉडेल असून कंपनीने ही बाईक अपेक्षित किमती पेक्षा कमी किंमतीत सादर केली आहे. तीन ऑगस्ट पर्यंत आता ग्राहकांना या बाईकची बुकिंग करता येऊ शकते. त्यानंतर बुकिंग थांबवण्यात येणार असून कंपनी पुढील उपलब्धतेनुसार बाईक साठी बुकिंग विंडो पुन्हा सुरू करणार आहे.

   

तुम्ही देखील ही बाईक खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला प्री बुकिंग करावी लागेल. त्यासाठी तुम्ही 5000 रुपये टोकन देऊन या बाईकची बुकिंग करू शकतात. या बाईकची किंमत फक्त 2.29 लाख रुपये आहे. Harley Davidson या ब्रँड च्या बाईक घेणे हे आज कालच्या तरुण पिढीचं स्वप्न आहे. पण न परवडणाऱ्या किमतीमुळे या ब्रांडच्या बाईक युवकांपर्यंत पोहोचू शकत नाही. पण नुकतीच लॉन्च झालेली ही Harley Davidson X440 परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असून सर्वांना बघता क्षणीच आवडेल. Harley Davidson X440 ही बाईक तीन वेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यात वायर स्पोक व्हील वाल्या X440 या क्लासिक वेरिएंट ची किंमत 2.29 लाख रुपये एवढी आहे. अलोय व्हील्सने सुसज्ज असलेल्या X440 विविद वेरिएंटची किंमत 2.49 लाख रुपये असून पूर्णपणे पिक्चर लोडेड X440 या वेरियंट ची X शोरूम किंमत 2.69 लाख रुपये एवढी आहे.

लूक आणि इंजिन –

Harley Davidson X440 या बाईकला डिझाईन आणि स्टायलिश लुक Harley Davidson ने दिला असून इंजीनियरिंग टेस्टिंग आणि डेव्हलप पूर्णपणे मोटोकार्प या कंपनीने केले आहे. कंपनीने या बाईकमध्ये डे टाईम रनिंग लाईट (DRL) चा वापर केला असून या लाईटवर Harley Davidson नाव टाकण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर रेट्रो लूक देणारी ही बाईक 440 CC क्षमता असलेली बाईक आहे. सिंगल सिलेंडर इंजिन वर चालणारी बाईक 6000rpm वर 27hp पावर आणि 4000rpm वर 38 Nm टॉर्क जनरेटर करते. या बाईकला 6 स्पीड ट्रान्समिशन म्हणजे 6 गिअरबॉक्स सोबत जोडलं गेलं असून स्टॅंडर्ड स्लीपर क्लच यात देण्यात आलं आहे.

अन्य फीचर्स –

Harley Davidson X440 या बाईक मध्ये सिंगल सीट सेटअप, मोठे ग्रेब रेल, ब्लूटूथ, कनेक्टिव्हिटी, TFT डिस्प्ले, सर्क्युलर शेप मध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसडी फोर्क्स, डिस्क ब्रेक, साईड स्टॅन्ड इंजन कट ऑफ फंक्शन, ड्युअल चॅनेल एबीएस, 18 इंचाचा फ्रंट आणि 17 इंचाचा मागील MRF टायर यात देण्यात आले आहे.