टाइम्स मराठी । Harley Davidson या ब्रँडच्या बाईक घेणे हे तरुण पिढीचं स्वप्न आहे. या बाईकचा अप्रतिम लूक, डिझाईन यामुळे तरुण पिढी या बाईककडे आकर्षित होते. काही महिन्यांपूर्वी भारतामध्ये ही बाईक कमी किमतीमध्ये लॉन्च करण्यात आली होती. बाईक लॉन्च झाल्यानंतर एका महिन्याच्या आत 25000 बाईक ची प्री बुकिंग करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीने काही काळासाठी बुकिंग थांबवली होती. परंतु आता कंपनीने पुन्हा या बाईकीची डिलिव्हरी सुरू केली आहे.
एवढ्या किमतीत करा फ्री ऑर्डर
अमेरिकन बाईक निर्माता कंपनी हार्ले डेविडसनने हिरो मोटोकार्प या कंपनीसोबत पार्टनरशिप केल्यानंतर भारतीय बाजारपेठेमध्ये पहिले मॉडेल लॉन्च केले होते. Harley Davidson X440 हे सर्वांत किफायती मॉडेल असून कंपनीने ही बाईक अपेक्षित किमतीपेक्षा ही कमी किंमतीत लॉन्च केली होती. तुम्ही देखील ही बाईक खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला प्री बुकिंग करावी लागेल. त्यासाठी 5000 रुपये टोकन रक्कम देऊन या बाईकची बुकिंग करता येऊ शकते. या बाईकची किंमत फक्त 2.29 लाख रुपये आहे.
डिझाईन– Harley Davidson X440
Harley Davidson X440 या बाईकला डिझाईन आणि स्टायलिश लुक Harley Davidson यांनी दिला आहे. आणि या बाईकचे इंजीनियरिंग टेस्टिंग आणि डेव्हलपिंग पूर्णपणे मोटोकार्प या कंपनीने केले आहे. कंपनीने या बाईकमध्ये डे टाईम रनिंग लाईट (DRL) चा वापर केला आहे. या लाईटवर Harley Davidson नाव टाकण्यात आलेलं आहे. रेट्रो लूक प्रदान करणारी ही बाईक 440 CC क्षमता असलेली बाईक आहे. सिंगल सिलेंडर इंजिन वर चालणारी बाईक 6000rpm वर 27hp पावर आणि 4000rpm वर 38 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकला 6 स्पीड ट्रान्समिशन म्हणजे 6 गिअरबॉक्स सोबत जोडलं गेलं असून स्टॅंडर्ड स्लीपर क्लच यात देण्यात आलं आहे.
फिचर्स
Harley Davidson X440 या बाईक मध्ये सिंगल सीट सेटअप, मोठे ग्रेब रेल, ब्लूटूथ, कनेक्टिव्हिटी, TFT डिस्प्ले, सर्क्युलर शेप मध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसडी फोर्क्स, डिस्क ब्रेक, साईड स्टॅन्ड इंजन कट ऑफ फंक्शन, ड्युअल चॅनेल एबीएस, 18 इंचाचा फ्रंट आणि 17 इंच मागील MRF टायर यात देण्यात आले आहे. यासोबतच या बाईकमध्ये गोल हेडलॅम्प, टीयर ड्रॉप पॅटर्न फ्युएल टॅंक, एलईडी लाइटिंग एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सल यासारखे बरेच आधुनिक फीचर्स देण्यात आले आहे.