Harley Davidson X440 भारतात लाँच; फीचर्स अन् किंमत पहा

टाइम्स मराठी । अमेरिकन बाईक निर्माता हार्ले डेविडसन यांनी भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वांत परवडणारे मॉडेल Harley Davidson X440 ही बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक अपेक्षित किमती पेक्षा कमी किंमतीत म्हणजे फक्त 2.29 लाख रुपये एवढ्या किंमतीत सादर केली आहे. कंपनीकडून ही बाईक ३ व्हेरिएन्ट मध्ये लाँच करण्यात आली आहे. Harley Davidson X440 ही बाईक भारतीय बाजारात CB350, Jawa Yezdi या कंपन्यांच्या गाड्यांसोबत स्पर्धा करेल. आज आपण या दमदार बाईकचे खास फीचर्स जाणून घेऊया….

   

हार्ले डेविडसन आणि हिरो मोटोकॉर्प यांनी पार्टनरशिप केल्यानंतर Harley Davidson X440 हे पाहिलं बाईक मॉडेल तयार करण्यात आलं. ही बाईक भारतात बनलेली असून रॉयल एनफिल्ड यासह होंडा करते. Harley Davidson या ब्रँडची बाईक घेणे हे आज कालच्या तरुण पिढीचं स्वप्न आहे. पण न परवडणाऱ्या किमतीमुळे या ब्रांडच्या बाईक युवकांपर्यंत पोहोचू शकत नाही. पण नुकतीच लॉन्च झालेली ही Harley Davidson X440 परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असून सर्वांना मोहून टाकणारी आहे.

किंमत किती?

Harley Davidson X440 ही बाईक तीन वेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आली असून वायर स्पोक व्हील वाल्या X440 या क्लासिक वेरिएंट ची किंमत 2.29 लाख रुपये एवढी आहे. त्याचबरोबर अलोय व्हील्स ने सुसज्ज असलेल्या X440 विविद वेरिएंटची किंमत 2.49 लाख रुपये असून पूर्णपणे पिक्चर लोडेड X440 या वेरियंट ची X शोरूम किंमत 2.69 लाख रुपये एवढी आहे. ही बाईक कंपनीच्या ऑफिशियल डीलरशिप च्या माध्यमातून बुक करता येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला बुकिंग साठी 25 हजार रुपये जमा करावे लागतील.

लुक

Harley Davidson X440 या बाईकला डिझाईन आणि स्टायलिश लुक Harley Davidson ने दिला असून इंजीनियरिंग टेस्टिंग आणि डेव्हलप पूर्णपणे मोटोकार्प या कंपनीने केले आहे. कंपनीने या बाईकमध्ये डे टाईम रनिंग लाईट (DRL) चा वापर केला असून या लाईटवर Harley Davidson नाव टाकण्यात आलेलं आहे.

इंजिन –

रेट्रो लूक देणारी ही बाईक 440 CC क्षमता असलेली बाईक आहे. सिंगल सिलेंडर इंजिन वर चालणारी Harley Davidson X440 बाईक 6000rpm वर 27hp पावर आणि 4000rpm वर 38 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकला 6 स्पीड ट्रान्समिशन म्हणजे 6 गिअरबॉक्स सोबत जोडलं गेलं असून स्टॅंडर्ड स्लीपर क्लच यात देण्यात आलं आहे.

अन्य फीचर्स –

Harley Davidson X440 या बाईक मध्ये सिंगल सीट सेटअप, मोठे ग्रेब रेल, ब्लूटूथ, कनेक्टिव्हिटी, TFT डिस्प्ले, सर्क्युलर शेप मध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसडी फोर्क्स, डिस्क ब्रेक, साईड स्टॅन्ड इंजन कट ऑफ फंक्शन, ड्युअल चॅनेल एबीएस, 18 इंचाचा फ्रंट आणि 17 इंचाचा मागील MRF टायर यासारखे फीचर्स मिळतात.