उडत्या विमानात वैमानिकाला आला हार्ट अटॅक, अन पुढे घडलं असं काही….

टाइम्स मराठी । विमानाच्या (Aeroplen) बाथरूम मध्ये एका विमान वैमानिकाला (Pilot) अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने खळबळ उडाली. परंतु प्रसंगावधान राखून सहवैमानिकांनी (Co-Pilot) विमान हँडल करून 271 प्रवाशांसोबत आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. ही घटना मियामी ते चिली या व्यवसायिक विमानाच्या सेंटीयागोला जाणाऱ्या LATAM एअरलाइन च्या फ्लाईट मध्ये घडली आहे. आपत्कालीन लँडिंग नंतर या वैमानिकावर तातडीने उपचार करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

   

LATAM एअरलाइनची फ्लाईट ही सेंटीयागोला निघाली होती. या फ्लाईट मध्ये असलेले मुख्य वैमानिक यांना बाथरूम मध्ये अचानक हृदयविकाराचा झटका आला. ही संपूर्ण घटना समजतात त्या ठिकाणी असलेल्या सहवैज्ञानिकांनी धाव घेऊन पनामा शहरातील डॉक्युमेंट आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केली. यावेळी विमानामध्ये असलेल्या प्रवाशांपैकी कोणी डॉक्टर असेल तर त्यांना मदतीची आवाहन देखील करण्यात आले. त्यानंतर दोन डॉक्टरांनी वैमानिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. परंतु त्यांना यश आले नाही. विमान लँड करताच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा जीव वाचू शकला नाही.

हृदयविकाराचा झटका आलेले हे वैमानिक 56 वर्षाचे होते. त्यांचं नाव कमांडर इव्हान आंदौर होतं. इव्हान यांना वाचवण्यासाठी एअरलाइन्स कडून सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले. आपत्कालीन लँडिंग आणि त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देखील इव्हान अंदोर यांना वाजवण्यात न आल्यामुळे LATAM एअरलाइन च्या ग्रुपने या दुर्दैवी घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले. अखेर विमान कंपनीने मृत्युमुखी पडलेल्या या वैमानिकाच्या कुटुंबीयांचे सात्वन केले असून वैमानिकाचा मृतदेह त्यांच्या कुटुंबांकडे सोपवला.