यशस्वी हृदयप्रत्यारोपण! हवाई दलाच्या विमानाने नागपूरहून पुण्यात आणले जिवंत मानवी हृदय

टाइम्स मराठी | एक जिवंत मानवी हृदय हवाई दलाच्या विमानाने नागपूर वरून पुण्याला हृदय प्रत्यारोपणासाठी (Heart Transplant) नेण्यात आले. यासाठी एक ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला होता. संरक्षण विभागाच्या प्रसिद्धिपत्रकांमधून याची माहिती देण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN32 या विमानाने शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजेच ह्रदय नागपूर येथून 700 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुण्यामध्ये पोहोचवण्यात आले. हे हृदय पाठवण्यासाठी नागरी प्रशासनाने ग्रीन कॉरिडोर बनवला होता.

   

नागपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये 20 जुलै रोजी गंभीर डोकेदुखी असलेल्या महिलेला ऍडमिट करण्यात आले होते. त्यानंतर या महिलेच्या डोक्यामध्ये गंभीर ब्लड क्लॉटिंग बनले असल्याचं लक्षात आलं. परंतु या महिलेचा ब्रेन डेड मुळे मृत्यू झाला. शुभांगी गण्यारपवार असं या महिलेचं नाव होतं. ही 31 वर्षीय महिला नागपूर मध्ये तिचा नवरा आणि दीड वर्षाच्या मुली सोबत राहत होती.

या घटनेनंतर नागपूर येथील जोनल कोऑर्डिनेशन सेंटर चे संयोजक दिनेश मंडपे यांनी महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना महिलेच्या अवयव दानासाठी विचारपूस केली. त्यानंतर शुभांगी चे पती आणि भावाने मिळून अवयव दानासाठी होकार दिला. चार जणांना हे अवयव देण्यात आले. हे अवयव एक पुण्यात तर तीन नागपुरामध्ये देण्यात आलेले आहेत. ह्रदय यकुत आणि दोन मूत्रपिंड यावेळी दान करण्यात आले. त्याचबरोबर ह्रदय हे पुण्यातील हवाई दलाच्या एका 39 वर्षीय व्यक्तीला हृदय प्रत्यारोपणासाठी नागपूर येथून पुण्याला नेण्यात आले.

याबाबत ट्विटरच्या माध्यमातून पुणे स्थित सदन कमांडर ने एआयसीटीएस ने हृदय प्रत्यारोपण यशस्वी पार पडल्याचं सांगितलं. या अवयव प्रत्यारोपणासाठी जीव वाचवण्याच्या उद्देशाने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. यासाठी वाहतूक विभाग अशा प्रकारे वाहतूक व्यवस्थापित करतो की महत्त्वाचा भाग 60 ते 70% पेक्षा कमी वेळेत पोहोचू शकेल.