HERO ने लहान मुलांसाठी आणि युवकांसाठी आणल्या 2 इलेक्ट्रिक बाईक

टाइम्स मराठी । टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरो मोटोकॉर्पने इटली येथील मिलान मध्ये आयोजित करण्यात आलेल्या EICMA मोटर शो मध्ये वेगवेगळ्या संकल्पनेचे अनावरण केले. हिरो मोटोकॉर्प  कंपनीने  XOOM 160 ही स्कूटर देखील या इव्हेंटमध्ये सादर केली होती. आता कंपनीने इव्हेंट मध्ये ऑफ लोडिंग इलेक्ट्रिक मोटरसायकल LYNX आणि CONCEPT ACRO ही मुलांसाठी डिझाईन करण्यात आलेली इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली. जगभरातील टू व्हीलर वाहन निर्माता कंपन्यांनी EICMA 2023 या मोटर शो मध्ये सहभाग घेतला आहे. एवढच नाही तर या शोमध्ये सुझुकी, होंडा, यामाहा यासारख्या बऱ्याच वाहन निर्माता कंपन्यांनी नवीन वाहन आणि कन्सेप्ट इव्हेंट मध्ये सादर केली आहेत.

   

HERO MOTOCORP LYNX डिझाईन

EICMA 2023 या मोटर शो मध्ये हिरो मोटोकॉर्प कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाईक LYNX ही एक ऑफ रोटिंग इलेक्ट्रिक बाईक आहे. ही बाईक जंगली जनावरांपासून प्रेरित आहे. मध्यम आकाराच्या जंगली मांजरीला प्रेरित होऊन ही बाईक डिझाईन करण्यात आली आहे असं कंपनीने सांगितलं. जेणेकरून कोणत्याही रस्त्यावर आरामात ही बाईक धावू शकेल.

फिचर्स

HERO MOTOCORP LYNX या इलेक्ट्रिक बाइक मध्ये मजबूत आणि चपळ फ्रेम देण्यात आली आहे. यामध्ये ब्रेकिंग सिस्टीम, फ्रॅक्शन कंट्रोल सोबतच स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासारखे बरेच फीचर्स देखील देण्यात आले आहे. ही बाईक आव्हानात्मक रोडवर सहजपणे चालवली जाऊ शकते. या बाईकच्या स्पेसिफिकेशन बाबत अजून माहिती मिळाली नसून ही बाईक अप्रतिम परफॉर्मन्स देईल अशी आशा आहे.  बाईकमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी कंपनीने इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला असल्याचे देखील उघड झालं आहे.

HERO MOTOCORP ACRO डिझाईन

HERO MOTOCORP कंपनीने दुसरी लॉन्च केलेली नवीन इलेक्ट्रिक बाइक कन्सेप्ट म्हणजे HERO ACRO. कंपनीने ही बाईक खास करून मुलांसाठी डिझाईन केली आहे. त्याचबरोबर मुलांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन ही बाईक डेव्हलप करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. या बाईकमध्ये थ्री पॉईंट ऍडजेस्टेबल फ्रेम आणि इनोव्हेटिव्ह फीचर्स  देण्यात आले आहे. कंपनीने ही बाईक 3 ते 9 वर्षांच्या मुलांसाठी डेव्हलप केली असून दिसायला आकर्षक आहे.

बॅटरी

HERO MOTOCORP ACRO यामध्ये कंपनीने वापरलेली फ्रेम ही मुलांच्या वयानुसार आणि उंचीनुसार ऍडजेस्ट करता येते. त्यासाठी जास्त वेळ लागत नसून फक्त 2 मिनिटांमध्ये फ्रेम ॲडजस्ट होते. या इलेक्ट्रिक बाइकची सीट, उंची, हँडल बारची स्थिती आणि लांबी हे देखील ऍडजेस्ट करता येतात. या इलेक्ट्रिक बाइक मध्ये बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी सहजरीत्या रिप्लेस करता येते.

फिचर्स

HERO MOTOCORP ACRO या बाईकच्या सेफ्टी साठी यामध्ये डिजिटल कंट्रोल देण्यात आले आहे. जेणेकरून पेरेंट्स बाईकची स्पीड लोकेशन आणि बाकीचे फीचर्स कंट्रोल करू शकतील. ही लो मेंटेनन्स बाईक असून सहजरीत्या मुले चालवू शकतात. कंपनीने ही बाइक कॉन्सेप्टच्या माध्यमातून सादर केली असून लवकरच या बाईकचे प्रोडक्शन मॉडेल देखील उपलब्ध करण्यात येईल.