Hero Karizma XMR 210 : अपडेटेड फीचर्समध्ये लाँच झाली Karizma XMR ; तरुणांना लावणार वेड

टाइम्स मराठी । हिरो कंपनीची स्टायलिश बाईक करिझ्मा (Hero Karizma XMR 210) नुकतीच कंपनीने नवीन फीचर सह लॉन्च केली आहे. एकेकाळी करिझ्मा ही बाईक तिच्या लुक मुळे प्रचंड फेमस होती. यासोबतच धूम चित्रपटांमध्ये करिझ्माने प्रचंड धूम केली होती. परंतु कालांतराने या बाईकचा खप कमी होत गेला. आणि भारतात या बाईकची निर्मितीच बंद झाली. आता मोठ्या उत्साहात नवीन लुक आणि डिझाईनमध्ये ही बाईक लॉन्च केली आहे. सोशल मीडियावर या बाईकची किंमत आणि फीचर्सबाबत चर्चा रंगताना दिसत आहे. कंपनी कडून घेण्यात आलेल्या एका इव्हेंटमध्ये ही karizma XMR लॉन्च करण्यात आली. जाणून घेऊया या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या karizma XMR बद्दल माहिती.

   

karizma XMR स्पेसिफिकेशन

Hero Karizma XMR 210 या बाईक मध्ये सिंगल सिलेंडर लिक्विड कुल 210cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 9250 RPM वर 25.1 BHP आणि 7250 RPM वर 20.4 NM पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबतच सहा स्पीड गिअर बॉक्स देण्यात आलेले आहे. यासोबतच स्लिप आणि असिस्ट क्लास देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

karizma XMR या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या बाईक मध्ये ड्युअल चॅनल एबीएस सिस्टीम देण्यात आली आहे.या सोबतच बाईकच्या दोन्ही चाकांला डिस्क ब्रेक आणि 17 इंचाचे अलोय व्हील्स देण्यात आले आहे. या बाईक मध्ये ऍडजेस्टेबल विंड स्क्रीन उपलब्ध करून देण्यात आलेली असून वाय आकाराच्या एलईडी डीआरडीएल सोबत एलईडी हेडलाईट सेटअप देखील उपलब्ध आहे. karizma XMR या बाईक मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहे.

किंमत किती? (Hero Karizma XMR 210)

Karizma XMR या बाईकमध्ये रियर व्ह्यू मिरर हे हॅण्डल बार या ऐवजी फेअरिंग वर देण्यात आले आहे. यासोबतच बाईक मध्ये फ्युएल टॅंक, क्लिप ऑन हँडल बार, स्प्लिट सीट सेटअप, एक्झॉस्ट आणि रियर एलईडी लाइटिंग यासारखे हार्डवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बाईकची किंमत 1,72,900 रुपये एवढी आहे. तुम्ही ही गाडी टर्बो रेड, यलो, मॅट फँटम ब्लॅक या कलर ऑप्शन्स खरेदी करू शकता.