Hero Maestro Edge येणार इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये; Ola – Ather ला देणार टक्कर

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळला आहे. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांचा खपही वाढत असून अनेक कंपन्या आपल्या गाड्या आता इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Hero आपली Maestro Edge इलेक्ट्रिक अवतारात आणू शकते. ही इलेक्ट्रिक गाडी Ola आणि Ather ला जोरदार टक्कर देईल.

   

मिळालेल्या माहितीनुसार, हिरो कंपनी Maestro Edge ही इलेक्ट्रिक स्कूटर दिवाळीमध्ये लॉन्च करू शकते. यामध्ये वेगवेगळ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन कंपनीकडून देण्यात येईल. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टॉपला असलेली Ola ही इलेक्ट्रिक मोटर सायकल निर्माता कंपनीच्या स्कूटर प्रमाणे Maestro Edge मध्ये देखील मोठा डिस्प्ले देण्यात येऊ शकतो.

200 किलोमीटर पर्यंत रेंज –

Maestro Edge या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये डिस्प्ले अँटी थेप्ट अलार्म, ABS, यापेक्षाही शानदार फीचर्स देण्यात येणार आहे. याबाबत आणखीन माहिती मिळाली नसून लॉन्चिंग दरम्यान या फीचर्स बद्दल माहिती मिळू शकेल. यासोबतच ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर 200 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते. गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Maestro Edge ही इलेक्ट्रिक स्कूटर 1.50 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. हिरो कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर ओला आणि अथर यासारख्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टॉपला असलेल्या स्कूटर सोबत प्रतिस्पर्धा करेल.