Hero Mavrick 440 । प्रसिद्ध दुचाकी उत्पादन कंपनी Hero Motocorp ने भारतीय बाजारात एक अतिशय मजबूत अशी बाईक लाँच केली आहे. Hero Mavrick 440 असे या बाईकचे नाव असून बाजारात ही गाडी रॉयल इन्फिल्डला जोरदार टक्कर देईल. कंपनीने अद्याप या दमदार बाईकची किंमत जाहीर केलेली नाही. आज आपण जाणून घेऊयात Hero Mavrick 440 चे खास फीचर्स…..
इंजिन – Hero Mavrick 440
कंपनीने या बाईक मध्ये 440 Cc सिंगल सिलेंडर पावरफुल इंजिन दिले आहे. हे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले असून 27hp ची पॉवर आणि 36Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन स्लिप-असिस्ट क्लच सिस्टम सह सुसज्ज आहे. या बाइकमध्ये अतिशय चांगलं सस्पेन्शन आहे. बाईकच्या पुढील बाजूस 43 मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल शॉक ऍबसॉरबर देण्यात आले आहेत. त्यामुळे तुमचा प्रवासही अगदी आरामदायी होणार आहे.
फीचर्स –
बाईकच्या फीचर्स बाबत सांगायचं झालयास यामध्ये समोरील बाजूला गोल हेडलॅम्प, ई-सिम, LCD डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, सिंगल-पीस सीट, डायमंड-कट अलॉय व्हील, कनेक्टेड तंत्रज्ञान, यांसारखे फीचर्स मिळतात. Hero Mavrick 440 बाईक तुम्ही लाल, निळा आणि काळ्या रंगात खरेदी करू शकता. एकूण ३ व्हेरियेण्ट मध्ये कंपनीने ही बाईक उपलब्ध केली आहे. त्यानुसार, गाडीची किंमत वेगवेगळी असणार आहे. भारतीय बाजारात हिरोची ही बाईक Triumph Speed 400, Royal Enfield Classic 350, Jawa 42 , Honda H’ness CB350 या गाड्यांशी थेट सामना करेल. येत्या फेब्रुवारी महिन्यात या बाईकचे बुकिंग सुरु होईल.