Hero चा ग्राहकांना दणका!! ‘या’ कारणामुळे Electric गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ

टाईम्स मराठी । देशात सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांचे मार्केट वाढलं आहे. पेट्रोल डीझेलच्या किमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. परंतु एक जून पासून वाहनांवर मिळणाऱ्या सबसिडी मध्ये घट झाल्यामुळे सर्व इलेक्ट्रिक स्कूटर आणि टू व्हीलरच्या किमती वाढल्या आहेत. यातच आता हिरो मोटोकार्प कंपनीने सुद्धा 3 जुलैपासून टू व्हीलर आणि स्कूटरच्या किमती वाढवलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

   

हिरो मोटोकार्प या कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर VIDA V1 Pro ची किंमत 6000 रुपयांनी वाढवून 1,45,900 रुपये एवढी करण्यात आली आहे. याबद्दल हिरो मोटोकार्प ने शुक्रवारी माहिती दिली. कंपनीने सांगितलं की इनपुट कॉस्ट आणि बऱ्याच कारणामुळे स्कूटर आणि टू व्हीलर च्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली असून यात 1.5 टक्के वाढ होणार आहे. यापूर्वी देखील एप्रिल मध्ये टू व्हीलर च्या किमतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. किमतीमध्ये होणारी वाढ ही पुनरावलोकनाचा एक भाग आहे.

मागील महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या बऱ्याच कंपन्या कमी किमतीत त्यांचे प्रॉडक्ट विकत होते. पण आता एक जून पासून सर्व कंपन्यांनी त्यांच्या प्रॉडक्टचे भाव वाढवल्यामुळे ग्राहकांना हवा तेवढा फायदा मिळू शकत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारकडून देण्यात येणाऱ्या सबसिडीमध्ये घट झाल्यामुळे ही महागाई वाढलेली आहे.

मागच्या महिन्यात उद्योग मंत्रालय आणि भारत सरकार यांनी नवीन नोटिफिकेशन जारी केले. यामध्ये FAME 2 म्हणजेच फास्टर एड एडोप्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिक हायब्रीड वेहिकल्स इन इंडिया या योजनेनुसार इलेक्ट्रिक स्कूटरवर देण्यात येणारी सबसिडी कमी करण्यात आली आहे. यापूर्वी ही सबसिडी 40 टक्के होती. ती आता कमी करून 15% एवढी झाली आहे. म्हणजेच या नियमानुसार सबसिडी इलेक्ट्रिक व्हेईकल बनवल्यावर प्रत्येक गाडीला 60,000 रुपयांपर्यत बसते. आता ही सबसिडी 22,500 एवढी झाली आहे.