Hero Motocorp लवकरच लाँच करणार Maxi Scooter

टाइम्स मराठी । भारतीय मार्केटमध्ये टू व्हीलर वाहन निर्माता कंपनी म्हणून Hero Motocorp प्रसिद्ध आहे. कंपनीने मार्केटमध्ये बरेच वाहन लॉन्च केले आहे. आता कंपनी लवकरच मार्केटमध्ये पावरफूल मॅक्सि स्कूटर लॉन्च करणार आहे. टू व्हीलर सेगमेंट मध्ये वाढती प्रतिस्पर्धा पाहता  कंपनीने नवीन पावरफुल स्कूटर लॉन्च करण्याची तयारी केली आहे. कंपनीने या अपकमिंग स्कूटर चा टीजर लॉन्च केला असून लवकरच ही स्कूटर मार्केटमध्ये येईल.

   

टीझर

मिळालेल्या माहितीनुसार, हिरो मोटोकॉर्प कंपनी पहिली एडवेंचर स्कूटरला लॉन्च करण्याची तयारी करत आहे. जेणेकरून या एडवेंचर स्कूटर सेगमेंट मध्ये एन्ट्री मिळेल. सोशल मीडिया हॅण्डलवर अपकमिंग एडवेंचर स्कूटरचा टीजर लाँच करत या टीजरमध्ये तीन मॉडेल दाखवले आहेत. टीझर मध्ये दाखवण्यात आलेले तिन्ही मॉडेल शानदार असून या स्कूटरचा लुक देखील अप्रतिम आहे.

पावरट्रेन

हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या या मॅक्सी स्कूटर मध्ये लिक्विड कुल्ड इंजिन वापरण्यात येऊ शकते. हिरोच्या लाईनअप मध्ये सध्या फक्त KARIZMA XMR यामध्ये लिक्विड कुल्ड इंजिनचा वापर करण्यात आला आहे. आता या मॅक्सी स्कूटरमध्ये देखील करिज्मा प्रमाणेच इंजिन वापरण्यात येण्याची शक्यता आहे. किंवा कंपनी नवीन पावरट्रेन देखील उपलब्ध करू शकते. यासोबतच यामध्ये 163 CC सिंगल सिलेंडर एअर कुल्ड इंजिन देखील मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन 16.6 BHP पॉवर आणि 14.6 nm पीक टॉर्क जनरेट करेल.

लुक आणि फीचर्स

हिरो मोटोकॉर्प कंपनीने लॉन्च केलेल्या टिझरमध्ये या मॅक्सी  स्कूटरचा लुक आणि डिझाईन बघायला मिळते. त्यानुसार या स्कूटरमध्ये अट्रॅक्टिव्ह फ्रंट फेसिंग देण्यात आली आहे. यामध्ये इंटिग्रेटेड LED DRL उपलब्ध आहे. या सोबतच ट्वीन LED हेडलॅम्प सेटअप देण्यात आले आहे. या अपकमिंग एडवेंचर स्कूटरमध्ये फुल कलर TFT स्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन म्युझिक प्ले बॅक, रायडर टेली मॅट्रिक्स यासारखे बरेच फीचर्स देण्यात येऊ शकतात. ही स्कूटर 1.30 लाख रुपयांच्या किमतीमध्ये लॉन्च होऊ शकते.