Hero Passion Pro येणार इलेक्ट्रिक अवतारात; किती किलोमीटर रेंज देणार?

टाइम्स मराठी । भारतातील सर्वात मोठी टू व्हीलर वाहन निर्माता कंपनी Hero Motocorp ने डेव्हलप केलेली बाईक Passion Pro ने प्रत्येकाच्या मनात घर बनवले आहे. हिरो कंपनीची Passion Pro प्रचंड प्रमाणात विक्री करण्यात आली होती. यापूर्वी ही बाईक 113.2cc इंजिन सह उपलब्ध करण्यात आली होती. आता कंपनीकडून ही बाईक इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.  इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये देखील ग्राहकांच्या मनात ही बाईक घर बनवू शकेल का? हे पाहणे योग्य ठरेल. कंपनीकडून ही बाईक 1.20 लाख ते 1.30 लाख रुपयांच्या किमतीमध्ये उपलब्ध करण्यात येऊ शकते. जाणून घेऊया फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

Hero Passion Pro च्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये कंपनीकडून 2.0 KW मोटर देण्यात येऊ शकते. ही मोटर 5000 rpm वर 6.4 NM पीक टॉर्क जनरेट करेल. या मोटर्स सोबतच 2.2  KWH लिथियम आयन बॅटरी च्या माध्यमातून पावर देण्यात येऊ शकते. ही बॅटरी 80 किलोमीटर पर्यंत रेंज देईल. तसेच अवघ्या 8 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर पर्यंत वेग वाढवण्यास ही बाईक सक्षम असेल.

फीचर्स

Hero Passion Pro इलेक्ट्रिक बाईक स्पोर्टी डिझाईन मध्ये उपलब्ध करण्यात येऊ शकते. त्यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, LED हेडलाईट आणि टेललाईट, साईड स्टॅन्ड इंडिकेटर, पार्किंग साठी  रिव्हर्स गियर  देण्यात येईल. जेणेकरून पार्किंग करताना कोणतेही अडचण येणार नाही. ही अपकमिंग बाईक हिरो इलेक्ट्रिकच्या  स्प्लेंडर, अथर 450X, बजाज चेतक इलेक्ट्रिक या गाडयांना टक्कर देईल.