टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे भाव आणि महागाई प्रचंड वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोळमडल्याचे दिसून येते. या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावाला आळा घालण्यासाठी भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा दबदबा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करणाऱ्याला प्राधान्य देत असतात, त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक अवतारात आणत आहेत. . त्यानुसार आता देशातील आघाडीची ऑटो कंपनी म्हणून ओळख असलेली हिरो स्प्लेंडर नवीन अवतारामध्ये लॉन्च होणार आहे. हिरो कंपनीने ही बाईक इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये (Hero Splendor Electric Bike) उतरवणार असल्याचं सांगितलं. हिरोच्या या नव्या स्प्लेंडरच्या लॉन्चिंग साठी मोठ्या प्रमाणात काम सुरू असून लवकरच ही बाईक मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
डिझाईन
होंडा कंपनीने लॉन्चिंग बद्दल अजून कोणतीच माहिती उपलब्ध केली नसून मीडिया रिपोर्ट नुसार लवकरच लाँच ही इलेक्ट्रिक बाईक (Hero Splendor Electric Bike) लाँच होणार असल्याची माहिती मिळत आहे. होंडा कंपनीची स्प्लेंडर यापूर्वी पेट्रोल व्हेरिएंट मध्ये उपलब्ध होती. ग्राहकांच्या मनात घर केलेली ही हिरो स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक व्हेरिएंट मध्ये कशा पद्धतीने ग्राहकांचे मन जिंकेल हे पाहणे योग्य ठरेल. या नवीन अपकमिंग इलेक्ट्रिक स्प्लेंडर मध्ये बरेच फीचर्स देण्यात येणार आहे. या बाईकच्या टॅंक डिझाईन मध्ये देखील बदल करण्यात येईल.
फिचर्स- Hero Splendor Electric Bike
अपकमिंग इलेक्ट्रिक स्प्लेंडर मध्ये मोबाईल चार्जिंग GPS स्पीड सेन्सर यासारखे आधुनिक फीचर्स देण्यात येणार आहे. यासोबतच अलॉय, फेंडर्स, टेल लाईट, फेंडर लाईट हे पूर्वीच्या मॉडेल प्रमाणेच राहतील. ही इलेक्ट्रिक बाइक 1.10 लाख रुपयांच्या किमतीमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. या बाईकमध्ये दमदार बॅटरी पॅक आणि मोटर देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या इलेक्ट्रिक बाइकच्या तारीख बद्दल आणि लॉन्चिंग बद्दल अजूनही अधिकारीक घोषणा करण्यात आलेली नाही.
पावरट्रेन
अपकमिंग इलेक्ट्रिक स्प्लेंडर (Hero Splendor Electric Bike) मध्ये 4KWH बॅटरी देण्यात येऊ शकते. ही बॅटरी 120 km पर्यंत रेंज देईल. याशिवाय या इलेक्ट्रिक बाइक मध्ये 180 किलोमीटर रेंज साठी 6 KWH बॅटरी आणि 240 km प्रभावशाली रेंज साठी 8KWH क्षमता असलेली बॅटरी देण्यात येऊ शकते. कंपनी या बाईक मध्ये 250 ते 300 km एवढी रेंज उपलब्ध करेल. त्यामुळे प्रवासासाठी ही बाईक ग्राहकांसाठी अतिशय परवडणारी ठरेल यात शंका नाही.