फक्त 9000 रुपयात खरेदी करा Hero Splendor Plus; पहा काय आहे ऑफर

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत सर्वात जास्त विकली जाणारी बाईक म्हणजे हिरो कंपनीची Splendor Plus. ही एक commuter बाईक आहे. जबरदस्त मायलेज, कोणत्याही रस्त्यावर कशीही चालवली तरी नो टेन्शन अशी सर्वसामान्य ग्राहकांना आवडणारी अशी Splendor Plus खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु काहींना बिकट आर्थिक परिस्थिती असल्याने इच्छा असूनही ही बाईक खरेदी करता येत नाही. परंतु आता हिरो कंपनी आपल्या या लोकप्रिय गाडीची विक्री वाढवण्यासाठी फायनान्स प्लॅन देत आहे. त्यानुसार, तुम्ही फक्त 9000 रुपयात Splendor Plus 100cc बाईक घरी घेऊन जाऊ शकता.

   

काय आहे ऑफर?

Hero Splendor Plus 100cc या बाईकची एक्स शोरूम किंमत 85,702 ते रु.90,409 पर्यंत आहे. तुम्हाला या बाईकच्या खरेदीसाठी 76,098 रुपयांचे कर्ज मिळू शकत. म्हणजेच तुम्ही फक्त 9000 रुपयांच्या डाउनपेमेंट वर ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता. त्यासाठी तीन वर्षासाठी दर महिन्याला 9.7 टक्के दराने 2445 रुपये EMI भरावा लागेल. याबाबतची अधिक माहिती घेण्यासाठी जवळच्या Hero शोरूमला भेट द्या.

Hero Splendor plus चे फीचर्स –

Hero Splendor Plus 100cc ही बाईक एयर कुल्ड टेक्नॉलॉजी वर आधारित असून सिंगल सिलेंडर इंजिनवर चालते. यामध्ये 97.2cc 4 स्ट्रोक इंजिन देण्यात आलं असून हे इंजिन 8.02 ps कमाल पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉक जनरेट करते. हे इंजिन चार स्पीड गिअरबॉक्सला जोडलेलं आहे. Hero splendor plus या बाईकच्या मायलेज बद्दल बोलायचं झालं तर ही बाईक 83 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.