Hero च्या स्वस्तात मस्त अन जास्त मायलेज देणाऱ्या Top 5 Bikes

टाइम्स मराठी । गेल्या काही वर्षापासून पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर महागाई देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की जनसामान्य लोकांच्या खिशाला खूप मोठा फटका बसला आहे. अशातच पेट्रोल डिझेल बाईक कडे आता दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कारण आज काल इलेक्ट्रिक बाइक घेण्याकडे जास्त कल बघायला मिळत आहे. असे असले तरीही भारतीय बाजारपेठेमध्ये अशा बऱ्याच बाईक उपलब्ध आहेत ज्या कमी पेट्रोलमध्ये जास्त मायलेज देतात. आज आम्ही तुम्हाला देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी Hero च्या अशा ५ गाड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची खरेदी किंमत तर कमी आहेच आणि या गाड्या मायलेज सुद्धा जास्त देत आहेत. चला सविस्तर जाणून घेऊया.

   
Passion Pro

1) Hero Passion Pro-

पॅशन प्रो ही हिरो कंपनीची लोकप्रिय बाईक मानली जाते. या बाईक मध्ये 113.2cc इंजिन देण्यात आले असून हे इंजिन 9bhp पॉवर आणि 9.79 Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये फोर स्पीड गिअर बॉक्स देण्यात आले आहे. Hero Passion Pro १ लिटर पेट्रोल मध्ये 55 किलोमीटरचे मायलेज देते. दिसायला आकर्षक आणि चालवायला सोप्पी असलेली पॅशन प्रो खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे 80 ते 90 हजार पर्यंत बजट असायला हवं.

Splendor Plus

2) Splendor Plus

हिरो कंपनीची सर्वात जास्त विकली गेलेली बाईक म्हणजे Splendor plus .स्प्लेंडर प्लसला देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात मागणी असून दिवसेंदिवस हि मागणी वाढतच चालली आहे. कंपनीने हिरो स्प्लेंडर प्लस 13 कलर्स व्हेरिएन्ट मध्ये आणली आहे. Splendor plus मध्ये 97.2 सीसी BS6 इंजिन देण्यात आले आहे. ही बाईक १ लिटर पेट्रोल मध्ये 60 किलोमीटर पर्यंत धावू शकते. या बाईकची किंमत 85000 रुपये आहे.

Hero Glamour

3) Hero Glamour

हिरो कंपनीची Hiro glamour ही बाईक सुरुवातीला हिरो आणि होंडा या कॉलेबोरेशन वर बनवण्यात आली होती. तेव्हा या बाईकला Hiro Honda glamour या नावाने ओळखले जात होतं. या बाईक मध्ये 4 स्पीड गिअर देण्यात आलेले असून डिस्क आणि ड्रम ब्रेक आहेत. ही बाईक 125cc पॉवरफुल इंजिन मध्ये मिळते. हे इंजिन 10.7 BHP पॉवर आणि 10.6 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकचे मायलेज 70 किलोमीटर पर लिटर आहे. जर तुमचं बजेट 95 हजार ते एक लाखापर्यंत असेल तर तुम्ही ही बाईक खरेदी करू शकता.

Super Splendor

4) Super Splendor

हिरो कंपनीची सर्वात पॉप्युलर बाईक म्हणून Super splendor या बाईकला ओळखले जाते. 68 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देणारी, ही कम्युटर बाईक स्टाईल, सुविधा आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीसह येते. या बाईक मध्ये 125cc इंजिन देण्यात आले असून हे इंजिन 10.7 bhp पॉवर आणि 10.6 nM टॉर्क जनरेट करते. Super splendor मध्ये सर्व्हिस रिमाइंडर,लो फ्युएल इंडिकेटर,रिअल टाइम मायलेज इंडिकेटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, फोन लो बॅटरी इंडिकेटर, यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

HF

5) HF Deluxe-

HF deluxe ही हिरो कंपनीची स्वस्तात मस्त आणि जास्त मायलेज देणारी बाईक आहे. स्प्लेंडर प्रमाणे या बाईक मध्ये देखील 97.2 cc इंजिन देण्यात आलं असून हे इंजिन 8.02 PS पॉवर और 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. HF deluxe एक लिटर पेट्रोल मध्ये 65 किलोमीटर अंतर पार करते. आणि महत्वाचे म्हणजे या किंमत फक्त 70,337 रुपये एवढी आहे