VIDA V1 चे न्यू एडिशन सादर; पहा कसा आहे लूक?

टाइम्स मराठी । इटली येथील मिलान मध्ये सुरू असलेल्या EICMA 2023 या मोटर शो मध्ये  वेगवेगळ्या वाहन निर्माता कंपन्या नवीन वाहन आणि कन्सेप्ट सादर करत आहेत. या शोमध्ये  सुझुकी हिरो, होंडा मोटोकॉर्प यासारख्या बऱ्याच  कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. होंडा मोटोकॉर्प कंपनीने शो मध्ये XOOM 160 लॉन्चिंग सोबतच LYNX हे इलेक्ट्रिक बाइक देखील लॉन्च केली आहे. आता कंपनीने याच शोमध्ये  VIDA V1 या बाईकचे नवीन एडिशन सादर केले आहे. भारतात वाढती प्रतिस्पर्धा आणि इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या पाहता कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आपलं वजन वाढवण्यासाठी ही स्कूटर लॉन्च केली आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या बाईक चे नाव Hero Vida V1 Coupe आहे.

   

डिझाईन

Hero Vida V1 Coupe ही नवीन स्कूटर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या  VIDA V1 चे नवीन एडिशन आहे. नवीन लॉन्च करण्यात आलेली ही स्कूटर ट्रान्सफरमोटीव सिंगल सीट डिझाईन मध्ये उपलब्ध करण्यात आली असून भारतात उपलब्ध असलेल्या मॉडेल पेक्षा वेगळी आहे. या सीटची खासियत म्हणजे हे सीड सीट मध्ये बदलता येऊ शकते.

फीचर्स

Hero Vida V1 Coupe या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये  कंपनीने हायटेक फीचर्स दिले आहे. त्यानुसार यामध्ये 7 इंच TFT टच स्क्रीन डिस्प्ले, क्रूज कंट्रोल, बूस्ट मोड मिळतात. या स्कूटरमध्ये कंपनीने चार रायडींग मोड दिले आहे. त्यानुसार इको, राईड, स्पोर्ट आणि राईडर कस्टमायजेबल हे मोड यामध्ये मिळतात.

बॅटरी पॅक

Hero Vida V1 Coupe या स्कूटर मध्ये  कंपनीकडून लॉंग रेंज वाली बॅटरी पॅक देण्यात येऊ शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लॉन्चिंग बद्दल अजून कोणतीच माहिती उपलब्ध नसून 2024 मध्ये पहिला तिमाही मध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या  VIDA V1 PRO या स्कूटरची टॉप स्पीड 80 किलोमीटर प्रति घंटा एवढी होती. त्याचबरोबर ही स्कूटर प्रति घंटा  3.2 सेकंदामध्ये शून्य ते 40% रेंज पकडत  होती.