Hero ने आणल्या 2 स्पोर्टी स्कूटर; मार्केट मध्ये घालणार धुमाकूळ

टाइम्स मराठी । इटली येथील मिलान मध्ये सुरू असलेल्या EICMA 2023 इव्हेंट मध्ये हिरो मोटोकार्प कंपनीने दोन नवीन स्कूटर सादर केल्या आहेत. या दोन्ही स्कूटर अप्रतिम डिझाईन सह उपलब्ध आहे. Hero Xoom 125R and Hero Xoom 160 असे या दोन्ही स्कुटरची नावे आहेत. या दोन्ही स्कुटर VIDA V1 PRO COUPE आणि HERO 2.5R XTUNT कॉन्सेप्ट वर डेव्हलप करण्यात आले आहेत. या स्पोर्टी स्कुटर मध्ये अप्रतिम फीचर्स आणि टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. जाणून घेऊया या स्कूटरचे स्पेसिफिकेशन.

   

डिझाईन

Hero Xoom 125R या स्कूटर च्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये टर्न इंडिकेटर्स, ऑल LED लाइटिंग देण्यात आली आहे. यासोबतच टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आणि ऑल डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील यामध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरची डिझाईन गरुडाच्या उड्डाणाने प्रेरित असल्याचा कंपनीने  सांगितले. तर दुसरीकडे Hero Xoom 160 ही कंपनीची प्रीमियम स्कूटर आहे. यामध्ये ट्वीन हेडलॅम्प आणि  लॉंग एप्रन, विंडस्क्रीन, टायर  सह 14 इंच अलॉय व्हील देण्यात आले आहे.

पावरट्रेन

Hero Xoom 125R या स्कूटरमध्ये 125cc इंजिन देण्यात आले आहे. तर Hero Xoom 160 या स्कूटरमध्ये 156cc लिक्विड कुल्ड इंजिन देण्यात येऊ शकते.  या दोन्ही स्पोर्टी स्कूटरच्या इंजिन बद्दल आणखीन कोणतीच माहिती देण्यात आली नसून लॉन्चिंग वेळी ही माहिती उपलब्ध होईल.

फिचर्स

HERO कंपनीच्या Hero Xoom 125R आणि Hero Xoom 160 या दोन्ही स्कूटर TVS NTORQ 125 आणि APRILIA SR125 या स्पोर्टी स्कूटर ला टक्कर देतात. Hero Xoom 160 या स्कूटरच्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये की लेस इग्निशन, स्मार्ट की, रिमोट सीट ओपनिंग फीचर्स, स्मार्ट फाइंडर, ड्युअल चेंबर हेडलाईट, LED टेललाईट  यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.