सणासुदीत खरेदी करा Hero ची जबरदस्त स्कुटर; किंमत 80 हजारांपेक्षा कमी

टाइम्स मराठी । सध्या भारतात सणासुदीचा काळ सुरु आहे. काही दिवसांवरच दिवाळी येऊन ठेपली आहे. सणासुदीच्या या काळात नवनवीन गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे तुम्हीही यंदाच्या दिवाळीत नवी स्कुटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रसिद्ध कंपनी Hero ची Hero Xoom तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरेल. चालवायला अतिशय सोप्पी, दमदार मायलेज आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेली Hero Xoom तुमच्यासाठी बेस्ट डील ठरेल.

   

किंमत

सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये धाकड लुक मध्ये अप्रतिम डिझाईन सह उपलब्ध असलेल्या स्कूटरची चलती प्रचंड आहे. हिरो कंपनीची Hero Xoom ही स्कूटर स्पोर्टी लूक मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर या स्कूटरमध्ये तीन व्हेरियंट आणि पाच कलर ऑप्शन उपलब्ध असून तुम्ही ही स्कूटर 75 हजार 499 मध्ये घरी घेऊन येऊ शकतात.

स्पेसिफिकेशन

HERO XOOM या स्कूटरमध्ये 110.9cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.5 BHP पावर प्रदान करते आणि 8.7nm पिक टॉर्क जनरेट करते. हिरो कंपनीच्या या डॅशिंग स्कूटरमध्ये 5.2 लिटरचा मोठा फ्युल टॅंक उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर यामध्ये देण्यात आलेल्या इंजिन बद्दल बोलायचं झालं तर सिंगल सिलेंडर एयर कुल्ड इंजिन यामध्ये देण्यात आले आहे. या एयर कुल्ड इंजिनमुळे लॉंग रूटवर हाय परफॉर्मन्स देण्यासाठी ही स्कूटर सक्षम आहे.

ब्रेकिंग सिस्टीम

Hero Xoom मध्ये कम्बाईन ब्रेकिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. स्कूटरच्या फ्रंट आणि रियर दोन्ही टायर मध्ये ड्रम ब्रेक वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर स्कूटरच्या फ्रंटला टेलिस्कोपीक फोर्क आणि रियर मध्ये सिंगल शॉक सस्पेन्शन उपलब्ध आहे. यामुळे रायडींग साठी आरामदायक अनुभव मिळतो.

फिचर्स

Hero Xoom मध्ये LED लाईट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, USB चार्जिंग पोर्ट यासारखे ऍडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर फोन कॉलिंग अलर्ट, एसएमएस अलर्ट  हे पिक्चर्स देखील उपलब्ध आहे. या स्कूटरमध्ये 12 इंच चे अलॉय व्हील उपलब्ध करण्यात आले असून ट्यूबलेस टायर देखील देण्यात आले आहे. ही स्कूटर Honda Dio आणि TVS ज्युपिटर सोबत प्रतिस्पर्धा करते.