Hero च्या स्वस्तात मस्त 3 Electric Scooter; 85KM रेंज; किंमती किती?

टाइम्स मराठी । सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर बघता सर्वसामान्य लोक इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त पसंत करत आहेत. किफायतशीर किंमत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून तिची बॉडी, सायलेंट व्हाईस, कम्फर्टेबल सीट यामुळे युवा वर्गामध्ये आकर्षक ठरते. बाजारात ओला तसेच Ather कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या फॉर्मात आहेत परंतु किमती जास्त असल्याने सर्वानाच त्या गाड्या खरेदी करता येतीलच असं नाही. यावर उपाय म्हणून आज आम्ही तुम्हला Hero कंपनीच्या 3 इलेक्ट्रिक स्कुटर बद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्हाला पैशाच्या बाबतीतही परवडतील तसेच मायलेज आणि फीचर्सने सुद्धा या स्कुटर परिपूर्ण आहेत.

   

1) Optima CX

हिरोच्या Optima CX इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत फक्त 67 हजार रुपये आहे. या स्कूटरमध्ये पोर्टेबल बॅटरी देण्यात आली असून तुम्हीही बॅटरी चार्ज करण्यासाठी तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला चार्जिंग सॉकेट इन्स्टॉल करण्याची गरज भासणार नाही. ही बॅटरी फुल्ल चार्ज करण्यासाठी 5 तासांचा कालावधी लागतो. परंतु एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हिरोची Optima CX तब्बल 82 किलोमीटर रेंज देते. या स्कुटरचे टॉप स्पीड 45 किलोमीटर प्रतितास इतकं आहे.

2) EDDY-

हिरोच्या EDDY या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 72 हजार रुपये इतकी आहे. दिसायला ही इलेक्ट्रिक स्कुटर खूपच स्टायलिश आहे. EDDY इलेक्ट्रिक स्कुटर फुल्ल चार्ज होण्यासाठीही 5 तासांचा वेळ लागतो. मात्र एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही स्कुटर 85 किलोमीटर पर्यंत रेंज देते. परंतु गाडीचा टॉप स्पीड अवघे 25 किलोमीटर प्रतितास असल्याने लांबचा पल्ला गाठताना थोडी अडचण होऊ शकते. या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फाईन माय बाईक, रिव्हर्स मोड, यूएसबी पोर्ट क्रूज, कंट्रोल यासारख्या फीचर्स मिळतात.

3) Flash LX-

हिरो Flash LX ही स्कूटर अगदी परवडणाऱ्या दरात असून या स्कूटर ची किंमत 59 हजार रुपये आहे. Flash LX स्कूटरचे टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास एवढं आहे. ही स्कूटर तुम्हाला रेड आणि व्हाईट या 2 कलर ऑप्शन मध्ये मिळते. Flash LX स्कूटरच्या फिचर बद्दल बोलायचं झालं तर डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अलोय व्हील, यूएसबी पोर्ट यासारखे फिचर देण्यात आलेले आहे. Flash LX ही स्कूटर पोर्टेबल बॅटरी सोबत येते. या बॅटरीला पूर्ण चार्ज करण्यासाठी ५ तास लागतात. मात्र एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर ही गाडी 85 किलोमीटर पर्यंत अंतर पार करेल.