बॉलीवूड चित्रपटातून सातत्याने हिंदूंचा अपमान; योगायोग की जाणीवपूर्वक घडवलेला कट?

टाइम्स मराठी । बॉलीवूड ही जगातली सगळ्यात मोठी चित्रपटसृष्टी मागील अनेक वर्षांपासून भारतातील विविध गोष्टी आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचे चित्रण आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवत असते. आजवळ बॉलीवूडने असे अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवून चाहत्यांचे मन जिंकले आहे. मात्र अलीकडंच्या काही काळात मुख्य प्रवाहातील सिनेमात हिंदू फोबियाचे व्यथित करणारे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे हिंदू समाजामध्ये नाराजी आहे, आपल्या संस्कृतीबद्दल चित्रपटाच्या माध्यमातून जे काही चित्र दाखवलं जात आहे त्यावरून समाजाने चिंता व्यक्त केली आहे. हिंदू व्यक्तिरेखांचे नकारात्मक चित्रण, हिंदू प्रतीकांचा अवमान, हिंदू परंपरांचा अपमान सातत्याने घडत आहे आणि त्यामुळे हिंदू विरोधी भावना रुजवत असल्याबद्दल बॉलीवूडच्या विरोधात आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

   

तस बघितलं तर हिंदू संस्कृतीचे नकारात्मक चित्र बॉलीवूड साठी काही नवे नाही. मात्र अलीकडच्या काळात हे सातत्याने घडत आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास, “पिके” (2014) आणि “ओ माय गॉड” (2012) या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू चालीरीतींना प्रश्नांकित करण्यात आले. मात्र त्याच वेळी अन्य धर्मीयांच्या चालीरीतींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. या निवडक नकारात्मक चित्रणामुळे बॉलीवूड वर पूर्वग्रहदूषित चित्रणाचा आणि दुहेरी मापदंड लावले जात असल्याचा आरोप होत आहे . अलीकडेच आलेल्या “आयसी 814 द कंदाहार हायजॅक” या चित्रपटात 1999 साली झालेल्या भारतीय विमानाच्या अपहरणाच्या घटनेचे चित्रण करण्यात आले आहे. या अपहरण प्रकरणात अपहरणकर्त्यांपैकी अनेकांना हिंदू नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे या चित्रणामागील उद्देशावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

“द आयसी 814” चित्रपटातील विवाद

“आयसी 814” या विमानाचे अपहरणकर्ते वास्तवात इस्लामी दहशतवादी होते मात्र चित्रपटात त्यांना हिंदू नावे देण्यात आली आहे. इतिहास विपर्यस्त पद्धतीने मांडणे आणि हिंदू समाजाची प्रतिमा मलिन करणे आज त्यामागचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. अशा चित्रणामुळे इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जातो. हिंदू समाजावर होत असलेला हा अन्याय असून या चित्रपटाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक एका समाजाविरोधात प्रचार केला जातो असा टीकाकारांचा आरोप आहे. आयसी 814 प्रकरणात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना हिंदू नावे देणे ही एकमेव घटना नाही. हिंदू प्रतीके आणि हिंदू व्यक्तिरेखा नकारात्मक पद्धतीने दाखवण्याच्या व्यापक मोहिमेचा तो एक छोटा हिस्सा आहे.अनेकांचे असे म्हणणे आहे की हा ट्रेंड धोकादायक आहे कारण तो एक नकारात्मक जनमत तयार करतो आणि चुकीचे पांयडे पाडत असतो. नेटफ्लिक्स नेटवर्कची भारतीय अधिकाऱ्यांशी नुकतीच एक बैठक झाली. देशांच्या भावनांचे चित्रण करताना संवेदनशीलता दाखविण्याचे आश्वासन त्यांनी या बैठकीत दिले. पण हे पुरेसे आहे का? हा प्रश्न कायम आहे.

सिनेमात हिंदू फोबियाची व्यापक मांडणी
बॉलीवूडच्या चित्रपटात सातत्याने हिंदूंना खलनायक किंवा अतिरेकी दाखविले जाते.समाजात व्यापक स्वरूपात त्याचे विपरीत परिणाम होतात.समाज हिंदू समाजापासून दूर होण्यास हे चित्रण कारण ठरते . सर्वधर्मसमभाव आणि सामान न्याय हे तत्व असलेल्या देशात त्यामुळे विभाजनवादी वातावरण तयार होते.आपल्या धर्माचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात येत आहे अशी भावनाही एका विशिष्ट समाजात रूढ होते.

पद्मावत चित्रपटात देखील हिंदू राजपूत योद्ध्यांचे चित्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आणि त्यामुळे या चित्रपटाच्या विरोधात देखील गदारोळ निर्माण झाला.आक्रमकांचे चित्रण सकारात्मक पद्धतीने दाखवताना भारतीय परंपरा आणि संस्कृती यांचा अवमान करण्यात आला.तसेच “सॅक्रेड गेम्स” या लोकप्रिय वेब सिरीज मध्ये त्रिशूल आणि भगवद्गीता या हिंदू प्रतीकांचा अवमान करण्यात आला. दिशाभूल करणाऱ्या आणि अवमान करणाऱ्या प्रसंगात ही दोन्ही प्रतीके चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आली. हिंदू परंपरांचा निवडक अपमान आणि अन्य धर्मीयांच्या परंपरा, चालीरीतींबद्दल टाळाटाळ बॉलीवूडच्या हिंदू फोबियाकडे विशेष लक्ष वेधून घेते.बॉलिवूडने याची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. हा फक्त सर्जनशील स्वातंत्र्याचा प्रश्न नाही तर कथा सादरीकरण करताना येत असलेली जबाबदारी आणि समाजाच्या भावनांचा आदर करण्याची जबाबदारी देखील निर्मात्यांवर येत असते

तळ टीप : समतोल सादरीकरणाची गरज

हिंदू परंपरा आणि संस्कृती यांचे चित्रण करताना बॉलिवूडने समतोल राखणे आवश्यक आहे.एखाद्या धर्मातील चालीरीती किंवा परंपरा यांच्यावर टीका करताना आदर राखला गेलाच पाहिजे. हिंदुत्वावर होत असलेली निवडक टीका जी “आयसी 814 हायजॅक” आणि अन्य चित्रपटात दिसून येते त्यामुळे समाजात खोलवर विभाजन होत असते आणि चुकीचे पायंडे पडत असतात.बॉलीवूड ने भारताची विविधता परिणामकारकपणे दाखवली आहे मात्र एखाद्या समाजाचे चित्रण करताना त्या समाजाची प्रतिष्ठा आणि आदर राखणे आवश्यक आहे. जनमत तयार करण्यात या क्षेत्राचा मोठा वाटा असतो आणि या ताकतीमुळेच कोणत्याही समाजाबद्दल पूर्वग्रह निर्माण होऊ नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी ही येत असते.

बॉलीवूडच्या हिंदू फोबियाबद्दल वादविवाद सुरू असताना कथा सादर करताना सतत विवेक बुद्धीचा वापर करणे आवश्यक आहे. सर्व धर्मांचा आणि विचारधारांचा आदर करणे आवश्यक आहे. खालील ट्विट मध्ये बॉलिवूडमधील काही चित्रपटांची यादी देण्यात आली आहे ज्यात गेल्या अनेक दशकापासून जाणीवपूर्वक हिंदू परंपरांचा अवमान केल्याचे आढळून आले आहे. बॉलिवूडचा हिंदू फोबिया हा योगायोग आहे, सर्जनशीलतेचे स्वातंत्र्य आहे की जाणीवपूर्वक रचलेला कट हे तुम्हीच ठरवा.