H’ness CB350 आणि CB350RS गाड्यांमध्ये प्रॉब्लेम?? कंपनीने मागवल्या परत

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत Honda कंपनीच्या टू व्हीलर आणि स्कूटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आता होंडा कंपनीने H’ness CB350 आणि CB350RS या बाईक्स ग्राहकांकडून परत मागवल्या आहेत. कारण या बाईक्समध्ये टेक्निकल समस्या उद्भवत असून या अडचणी दूर करण्यासाठी कंपनी या बाईक्स ग्राहकांकडून परत मागवत आहे. यासोबतच कंपनीकडून ग्राहकांना काही टिप्स देखील देण्यात येत आहेत.

   

खराब पार्ट फ्री मध्ये बदलण्यात येणार

मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ग्राहकांना H’ness CB350 आणि CB350RS बाईक्स जवळच्या बिगविंग डीलरशिप जवळ घेऊन जावे लागतील. कारण या मॉडेलच्या मागच्या स्टॉप लाईट स्विचच्या रबर वाल्या पार्टमध्ये अडचण असल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही बाइक्स मध्ये असलेले खराब पार्ट फ्री मध्ये बदलण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितलं.

स्विचच्या रबरमध्ये प्रॉब्लेम असल्याची शक्यता

होंडा कंपनीने टेललाईट स्विच आणि बॅक अँगल सेंसर मध्ये खराबी असल्याचे संकेत दिले आहे. होंडा कंपनीनुसार ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2023 या काळामध्ये H’ness CB350 आणि CB350RS बाईक्स मध्ये समस्या आढळून आली. त्याचबरोबर स्विचच्या रबरमध्ये देखील अडचण असण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे.

सेंसर हाऊसिंग मोल्डिंग मध्ये देखील उद्भवला प्रॉब्लेम

H’ness CB350 आणि CB350RS बाईक्समध्ये सेन्सर हाऊसिंग च्या मोल्डिंग मध्ये देखील बऱ्याच कमी दिसून आल्या. यासोबतच सेन्सर मध्ये  पाणी गेल्यामुळे देखील या समस्या उद्भवू शकतात असं कंपनीने सांगितलं. H’ness CB350 आणि CB350RS बाईचे अपडेटेड मॉडेल कंपनीने मार्चमध्ये लॉन्च केले होते.

स्पेसिफिकेशन

H’ness CB350 आणि CB350RS बाईक्स मध्ये 348.36 सीसी सिंगल सिलेंडर एयर कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 20.6 BHP पावर आणि 30 NM पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत कंपनीने 5 स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप एंड असिस्ट क्लच देखील देण्यात आले आहे. या दोन्ही बाइक्स मध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, ABS, होंडा कनेक्टेड टेक्नॉलॉजीसह बरेच फीचर्स देण्यात आले आहे.