टाइम्स मराठी । भारतात सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर म्हणजे होंडा कंपनीची एक्टिवा (Honda Activa 125). जेव्हा एखादा व्यक्ती स्कुटर घेण्याचा विचार करतो तेव्हा त्याच्या मनात पहिले नाव हे होंडा ऍक्टिवा हेच येत. चालवायला अतिशय सोप्पी आणि तितकीच मजबूत अशी होंडाची ऍक्टिव्हा सर्वांच्या मनात घर करते. त्यातच आता आपल्या ग्राहकांना आणखी खुश करण्यासाठी होंडा कंपनीकडून एक्टिवा 125 या स्कूटरच्या सर्व मॉडेल्स वर सूट देण्यात येत आहे. जर तुम्ही फायनान्स वर स्कूटर खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही ही स्कूटर नक्कीच अगदी १० हजार रुपयांत घरी घेऊन जाऊ शकता. यामध्ये डाऊन पेमेंट इएमआय, व्याज यासारखे वेगवेगळे ऑफर्स देण्यात आलेले आहे.
काय आहे ऑफर ? (Honda Activa 125)
होंडा एक्टिवा ड्रम अलॉय-
होंडा कंपनीची Activa 125 च्या ड्रम अलॉय वेरिएंटची एक्स शोरूम किंमत 83,474 रुपये एवढी असून या स्कूटरची ऑन रोड प्राईस 98,243 एवढी आहे. जर तुम्ही फायनान्सच्या माध्यमातून ही स्कूटर घेऊन इच्छित असाल तर तुम्हाला 10000 रुपये भरावे लागतील. त्यानंतर तुम्हाला 88243 रुपये लोन मिळेल. तुम्हाला हे कर्ज तीन वर्षासाठी नऊ टक्के व्याजदराने फेडावे लागेल. तुम्ही हे लोन EMI च्या आधारावर 36 महिन्यांसाठी 2806 रुपये प्रति महिना या हप्त्याने फेडू शकता. तुम्हाला तीन वर्षांमध्ये यासाठी 13 हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज लागू शकते
होंडा एक्टिवा 125 ड्रम-
Honda Activa 125 च्या ड्रम वेरिएंट बद्दल बोलायचं झालं तर, या स्कूटर ची एक्स शोरूम किंमत 79,806 रुपये एवढी असून ऑन रोड किंमत 94239 एवढी आहे. जर तुम्ही ही स्कूटर खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला डाऊन पेमेंट वर तुम्ही हे स्कूटर घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये फायनान्स करावा लागेल. तुम्हाला 84,239 रुपये लोन मिळेल. आणि तुम्हाला तीन वर्षासाठी 9% व्याजदर या हिशोबाने कर्ज फेडावे लागेल. हे लोन तुम्हाला 36 महिन्यांपर्यंत 2689 रुपये महिना याप्रमाणे भरावे लागेल. तीन वर्षासाठी तुम्हाला या स्कूटरला 12 हजार रुपये पेक्षा जास्त व्याज लागू शकते.
काय आहेत होंडा ऍक्टिव्हाचे फीचर्स –
होंडा कंपनीची एक्टिवा 125 या स्कूटरचे चार व्हेरिएंट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. Activa 125 या स्कुटर मध्ये 124cc इंजिन देण्यात आलेले असून ते 8.30 PS ची कमाल पॉवर आणि 10.4 NM पीक टॉर्क जनरेट करते. एका लिटर मध्ये ही स्कूटर 55 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देते. वैशिष्ट्यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, Honda Activa 125 स्कूटरला साइड-स्टँड कट-ऑफ स्विच, एक एक्सटर्नल इंधन फिलर कॅप, एक ओपन ग्लोव्हबॉक्स आणि LED पोझिशन लॅम्पसह एक एलईडी हेडलॅम्प मिळतो. तसेच यामध्ये लहान डिजिटल स्क्रीन रिअल-टाइम मायलेज, इंधन गेज,यांसारखे फीचर्स मिळतात. याशिवाय गाडीचे टॉप-एंड व्हेरिएंट स्मार्ट कीसह येतो जो स्मार्ट फाइंड, स्मार्ट सेफ, स्मार्ट अनलॉक आणि स्मार्ट स्टार्ट यासारख्या अनेक फंक्शन्ससह येते. Activa 125 ही स्कूटर सुझुकी एक्सेस 125, टीव्हीएस ज्युपिटर 125, यासह हिरो, बजाज, यामाहा यासारख्या स्कूटर सोबत प्रतिस्पर्धा करते.