Honda Activa 125 तुमच्यासाठी ठरेल बेस्ट; अपडेटेड फीचर्सने आहे सुसज्ज

Honda Activa 125 : भारतात सर्वात जास्त वाहन करणारी कंपनी म्हणजे  Honda . होंडा कंपनीचे वाहन ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आवडत असतात. यासोबतच Honda कंपनीची Activa Scooter ही तरुणांना प्रचंड पसंतीस पडते. चालवायला अतिशय सोप्पी, तेवढीच दणकट आणि दमदार मायलेज असल्याने अनेकजण Activa खरेदी करण्याकडे आपली पसंती दर्शवतात. सध्या तुम्ही सुद्धा नवीन स्कुटर घेण्याचा विचार करत असाल तर Honda Activa 125 ही स्कूटर तुमच्यासाठी अप्रतिम ठरेल. ही स्कूटर  47 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. आज आपण जाणून घेऊया या स्कूटरचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

स्पेसिफिकेशन- Honda Activa 125

Honda Activa 125 ही स्कूटर चार व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. करण्यात आली आहे. Activa 125 या स्कुटर मध्ये 124cc पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे.  हे इंजिन 8.30 PS  मॅक्झिमम पावर वर 10.4 NM पीक टॉर्क जनरेट करते.  ही ऍक्टिवा स्कूटर 55 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. भारतीय बाजारात ही स्कुटर Suzuki Access 125, TVS Jupiter ज्युपिटर 125, Hero , Bajaj , Yamaha यासारख्या स्कूटर सोबत प्रतिस्पर्धा करते.

डिझाईन

Honda Activa 125 या स्कूटरमध्ये एप्रन माउंटेन फ्रंट टर्न इंडिकेटर्स आणि बॉडी कलर फ्रंट फेंडर देण्यात आले आहे.  स्कूटर च्या बॉडी कलर काऊन सह सिंगल पोड हेडलाईट देखील उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबतच वर क्रोम गार्निशिंग करण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये LED पोझिशन लॅम्प, LED हेडलाईट एसीजी स्टार्टर, आइडलिंग स्टॉप सिस्टीम देण्यात आली आहे. या स्कूटरचे वजन 110 किलोग्रॅम एवढे आहे.

ऍडव्हान्स फिचर्स

Honda Activa 125 मध्ये स्मार्ट फाइंड, रिमोट अनलॉक, की लेस इग्निशन यासारखे बरेच फीचर्स उपलब्ध आहे. सेफ्टी साठी या स्कूटरमध्ये कम्बाईन ब्रेकिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. यामुळे स्कूटरच्या दोन्ही टायरला राईड करताना फुल कंट्रोल उपलब्ध होतो. त्यानुसार स्कूटरच्या समोरच्या साईडने डिस्क ब्रेक आणि रियल मध्ये ड्रम ब्रेक वापरण्यात आला आहे. तसेच यामध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ओडोमीटर, क्लॉक, ECO इंडिकेटर आणि सर्विस ड्यू इंडिकेटर्स  देण्यात आले आहे.

किंमत किती?

होंडा कंपनीची Activa 125 या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 79,806 रुपयांपासून 88979 रुपयांपर्यंत आहे. होंडा कंपनीच्या Activa 125 च्या ड्रम वेरिएंट बद्दल बोलायचं झालं तर, या स्कूटर ची एक्स शोरूम किंमत  79,806 रुपये एवढी असून ऑन रोड किंमत 94239 एवढी आहे. याशिवाय Activa 125 च्या ड्रम अलॉय वेरिएंटची एक्स शोरूम किंमत 83,474 रुपये एवढी असून या स्कूटरची ऑन रोड प्राईस 98,243 एवढी आहे.