Honda Activa Electric मध्ये येणार; या तारखेला होणार लाँच

टाइम्स मराठी । भारतामध्ये सर्वात जास्त प्रोडक्ट विक्री करणारी Honda कंपनीची Activa ही अत्यंत लोकप्रिय स्कूटर आहे. आज देखील ही स्कूटर डिमांड मध्ये असून या होंडा कंपनीच्या Activa चे बरेच वर्जन लॉन्च करण्यात आले. हे सर्व वर्जन हिट झाले असून आता Honda Activa लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये एंट्री मारणार आहे. आत्तापर्यंत इतर कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आणत असताना आता Honda सुद्धा आपली Honda Activa Electric मध्ये आणणार आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये काय काय फीचर्स देण्यात येतील हे जाणून घेऊया.

   

बॅटरी– Honda Activa Electric

Honda Activa Electric या अपकमिंग स्कूटरमध्ये दोन बॅटरी देण्यात येणार आहे. त्यापैकी एक स्वॅपेबल बॅटरी आणि दुसरी फिक्स बॅटरी असणार आहे. सुरुवातीला ही स्कूटर ग्लोबल मार्केटमध्ये एशिया, युरोप आणि जपान मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. सुरुवातीला ही स्कूटर 2024 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि या सोबतच काही देशांमध्ये ही स्कूटर 2025 ला लॉन्च करण्यात येईल. Honda Activa Electric ही अपकमिंग इलेक्ट्रिक स्कूटर २ वेरिएंट मध्ये कंपनी लॉन्च करणार आहे. त्यामध्ये एक म्हणजे नॉर्मल आणि एक असेल प्रीमियम. या नॉर्मल व्हेरीएन्टची किंमत 1 लाख 20 हजार रुपये एवढी असेल. आणि प्रीमियम स्कूटरची किंमत 1.5 लाख रुपये एवढी असेल.

कोणाला टक्कर देईल –

होंडा कंपनीची ही अपकमिंग होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola , Ather, ओकिनावा या इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर सोबत प्रतिस्पर्धा करेल. Ola, Ather आणि ओकिनावा या तीनही कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपन्या सध्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टॉपला आहेत. यासोबतच या कंपन्यांच्या स्कूटरच्या किमती देखील जास्त आहेत.