Honda Activa Electric : Honda ची Activa येणार Electric व्हर्जनमध्ये; Ola ला देणार टक्कर

Honda Activa Electric : भारतीय बाजारपेठेत Honda Activa स्कूटर मोठ्या प्रमाणात पसंत केले जाते. आतापर्यंत Honda Activa स्कूटरची विक्री भारतात मोठ्या प्रमाणात झाली आहे. अशातच इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती मागणी पाहता Honda कंपनीने आता एक्टिवाचे Electric व्हर्जन लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. एक्टिवाचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने यापूर्वी दिली होती. त्यानंतर ग्राहक मोठ्या प्रमाणात या इलेक्ट्रिक वर्जनची प्रतीक्षा करत आहे. आता या इलेक्ट्रिक स्कूटर च्या लॉन्चिंग बद्दल माहिती देण्यात आली आहे.

   

2024 जानेवारीला स्कूटरचे अनावरण होण्याची शक्यता

9 जानेवारी ला कंजूमर इलेक्ट्रॉनिक शो 2024 मध्ये होंडा कंपनी एक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटरचे (Honda Activa Electric) अनावरण करू शकते. सध्या तरी होंडा कंपनी 2030 पर्यंत 30 नवीन प्रॉडक्ट भारतात लॉन्च करण्याची योजना आखत आहे. पेट्रोल इंजिन मध्ये उपलब्ध असलेली होंडा एक्टिवा ही स्कूटर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात आकर्षित करते. आता एक्टिवा चे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील ग्राहकांना पसंत पडेल की नाही हे पाहणे योग्य ठरेल. त्यासाठी होंडा कंपनी चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा ठेवत आहे.

लॉन्च झाल्यावर देईल Ola ला टक्कर

सध्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. होंडा कंपनीची एक्टिवा इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये (Honda Activa Electric) लॉन्च झाल्यानंतर Ola च्या स्कूटर सोबत प्रतिस्पर्धा करेल. यापूर्वी होंडा कंपनीने एक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटर जपान मोबिलिटी शोमध्ये सादर केली होती. परंतु आता कंपनी अपकमिंग एक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटर त्याच डिझाईन मध्ये उपलब्ध करेल की यामध्ये देखील बदल होऊ शकतात हे अजून उघड झालेले नाही.

स्पेसिफिकेशन- (Honda Activa Electric)

या अपकमिंग ॲक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देण्यात येणाऱ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दल अजून कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बरेच फीचर्स देण्यात येऊ शकतात. आणि मायलेज देखील ही स्कूटर Ola प्रमाणेच देईल अशी आशा आहे.