Honda च्या या गाड्यांवर लाखो रुपयांचा Discount; तुम्हीही संधी सोडू नका

टाइम्स मराठी । प्रसिद्ध अशी होंडा कंपनी (Honda) भारतीय बाजारामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या गाड्यांची विक्री वाढवण्याची सतत वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत असते. भारतात होंडा होंडा अमेझ, फिफ्थ जेन सिटी, सिटी हायब्रीड आणि होंडा एलिवेट अशा मुख्य गाड्यांची विक्री करते. नुकतंच कंपनीने खास सप्टेंबर महिन्यात आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी या सर्व गाड्यावर स्पेशल डिस्काउंट ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत तुमची लाखो रुपयांची बचत होणार आहे.

   
Honda Amaze

होंडा अमेझ (Honda Amaze) –

होंडा कंपनीच्या होंडा अमेझ या कार वर कंपनीकडून सूट देण्यात येत आहे. या कारमध्ये 1.2 लिटर वी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. त्याचबरोबर यात 1.5 लिटर आय डीटेक डिझेल इंजिन देखील उपलब्ध आहे. या इंजिनमध्ये ऑटोमॅटिक गिअर बॉक्स देण्यात आलेले असून ही कार मारुती सुझुकी डिजायर , टाटा टिगोर , हुंडाई ऑरा ला टक्कर देते. या कारमध्ये 1199 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 88.5 BHP पावर देते. कारच्या मायलेज बद्दल बोलायचं झालं तर ही कार 18.3 ते 18.6 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. कंपनी या कारवर 16000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. यामध्ये 10,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. एवढेच नाही तर 6000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देखील मिळत आहे.

citycover 1024x683 1

फिफ्थ जेन सिटी (Fifth Gen City)

होंडा कंपनी ची फिफ्थ जेन सिटी ही तुम्ही खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला 10,000 रुपये रोख सवलत, 10000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि कार खरेदीवर 8000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे. जर तुमच्याकडे पूर्वीपासूनच होंडा कंपनीची कोणतीही कार असेल आणि तुम्ही एक्सचेंज करू शकत असाल तर तुम्हाला अतिरिक्त सूट मिळू शकते. या कारमध्ये 1.5 i VTEC पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सहा स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स ने सुसज्ज आहे. त्याचबरोबर या कारमध्ये देण्यात आलेले इंजिन 121 PS पावर 6600 RPM प्रदान करते. त्याचबरोबर 4300 RPM वर 145 nm पीक टोर्क जनरेट करते. या कारमध्ये देण्यात आलेल्या डिझेल वेरियंट मध्ये 1.5L IDTEC इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सहा स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स सह उपलब्ध आहे.

City Hybrid

सिटी हायब्रीड (City Hybrid)

होंडा कंपनीच्या Honda City E: CHIV या कारवर कंपनी मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहे. त्यानुसार कार वर 1 लाख रुपये डिस्काउंट देण्यात येत आहे. यामध्ये केस डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. सध्या तरी ही कार कंपनीकडून 18.89 लाख रुपयांपासून 20.39 लाख रुपये एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये 1498 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 96.55 BHP पावर प्रदान करते. त्याचबरोबर ही कार 27.13 kmpl एवढे मायलेज देते.