टाइम्स मराठी । सध्या सर्वत्र फेस्टिवल सिझन सुरू असून बऱ्याच ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टवर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. फेस्टिवल सीजन किंवा दिवाळीमध्ये वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे चांगल्या मुहूर्तावर ग्राहक कार खरेदी करण्याचा विचार करतात. परंतु काय खरेदी करण्यापूर्वी कारचे मायलेज, लुक, डिझाईन, सिक्युरिटी या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. त्याच प्रकारे आजच्या तरुण पिढीला न्यू जनरेशन, अप्रतिम फीचर्स असलेली कार मोठया प्रमाणात पसंतीस उतरते. त्यानुसार तुम्ही देखील या फेस्टिवल सीजन मध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. प्रसिद्ध कंपनी Honda ने आपल्या २ गाड्यांवर तब्बल 75000 रुपयांपर्यंत डिस्काउंट डिस्काउंट ऑफर (Honda Cars Discount) ठेवली आहे. यामध्ये Honda City Fifth Gen आणि Honda Amaze या दोन मॉडेलचा समावेश आहे. ही डिस्काउंट ऑफर ऑक्टोबर पर्यंतच मर्यादित आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही ऑफर आणि डिटेल्स.
काय आहेत ऑफर्स- Honda Cars Discount
तुम्ही Honda City Fifth Gen सेडन कार खरेदी करणार असाल तर तुम्हाला 25 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर मिळू शकते. यासोबतच 26 हजार 947 पर्यंत फ्री ॲक्सेसरीज देखील मिळू शकतात. कंपनीकडून यावर लॉयल्टी बोनस म्हणून चार हजार रुपयांचा डिस्काउंट देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, Honda Amaze या गाडीवर तुम्हाला 57 हजार पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. यामध्ये कॉर्पोरेट डिस्काउंट रॉयल्टी बोनस, आणि स्टॅंडर्ड डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.
एक्सचेंज ऑफर
Honda Car India कडून, एक्सचेंज ऑफर (Honda Cars Discount) देखील उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या जुन्या होंडा कारला होंडा सिटी सह एक्सचेंज करणार असाल तर तुम्हाला 6000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. आणि यासोबतच या सेडान कारवर कॉर्पोरेट डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. त्यानुसार या सेडान मॉडेलवर 5000 रुपयांपर्यंत स्टॅंडर्ड डिस्काउंट मिळणार आहे. आणि कॉर्पोरेट सूट बद्दल बोलायचं झालं तर 20,000 रुपयांपर्यंत बंपर सूट यावर मिळू शकते.