Honda CB1000 Hornet । होंडा कंपनीने CB1000 होर्नेट या बाईकचे अनावरण केले आहे. इटली मधील मिलान येथे आयोजित करण्यात आलेल्या EICMA या मोटर शो 2023 मध्ये कंपनीने या बाईकचे अनावरण केले. होंडा कंपनीचे वाहन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल असतो. त्यातच होर्नेट ला देखील ग्राहकांकडून मोठी पसंती दिली जाते. या होर्नेटचा लूक आणि डिझाईन अप्रतिम आहे. नविन CB1000 होर्नेट ही लाईनअप मधील सर्वात शानदार बाईक असेल. ही बाईक तीन कलर ऑप्शन मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.
स्पेसिफिकेशन
Honda CB1000 Hornet यामध्ये देण्यात येणाऱ्या इंजिन बद्दल बोलायचं झालं तर, 999cc इनलाइन 4 सिलेंडर, DOHC 16V इंजिन यामध्ये देण्यात येणार आहे. हे इंजिन 147.5 bhp पावर आणि 100 nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन ला 6 स्पीड गिअरबॉक्स सह जोडण्यात आले आहे. होर्नेट मध्ये देण्यात आलेले इंजिन CBR1000RR फायरब्लेड मध्ये उपलब्ध असलेल्या इंजिन प्रमाणेच आहे.
डिझाईन– Honda CB1000 Hornet
Honda CB1000 Hornet या बाईकच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, बाईकला आकर्षक लुक देण्यात आला आहे. यासोबतच बाईक मध्ये ड्यूल LED प्रोजेक्टर हेडलाईट सुपर कॉम्पॅक्ट देण्यात आले आहे. याशिवाय कंपनीने या बाईकमध्ये स्पोर्टी लुक मध्ये मोठा फ्युएल टॅंक उपलब्ध केला आहे. याच फ्युएल टॅंक ची डिझाईन बाईकला आणखीनच आकर्षक बनवते. या फ्युएल टॅंक वर हॉर्नेट सिग्नेचर देखील देण्यात आली आहे.
ब्रेकिंग सिस्टीम आणि सस्पेंशन
Honda CB1000 Hornet या बाईक मध्ये फ्रंटला शोवा 41mm SFF BP USD फार्क आणि रियर मध्ये शोवा मोनोशॉक उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 17 इंच अलॉय व्हील देण्यात आले असून अप्रतिम ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. त्यानुसार बाईकच्या फ्रंटला 310 mm फ्लोटिंग डिस्क, रियर ला 256 mm डिस्क ब्रेक वापरण्यात आला आहे.
फिचर्स
Honda CB1000 Hornet या बाईक मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सह फुल कलर 5 इंच TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले सोबत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे. या बाईक ला पूर्णपणे LED लाइटिंग सुसज्ज करण्यात आली आहे. यामध्ये देण्यात आलेले ड्युअल LED प्रोजेक्टर हेडलाईट्स बाईकला आणखीनच आकर्षक बनवतात. या बाईक मध्ये थ्रोटल बाय वायर TBW फीचर देण्यात येईल. त्याचबरोबर यामध्ये तीन प्री सेट रायटिंग मोड, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल HSTC, इझी गिअर शिफ्टर, असिस्ट स्लीपर क्लच, 17 इंच अलॉय व्हील यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे.